शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

त्वचेसाठी लव्ह बाइट ठरू शकतो घातक, इतका की तुम्ही विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 13:34 IST

Love Bite Side Effects : अनेकदा पार्टनर अतिउत्साहात शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी लव्ह बाइट देतात. ज्यामुळे त्या भागावर लाल रंगाचा चट्टा दिसतो.

Love Bite Side Effects : कपल्स आपलं प्रेम वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असतात. यातीलच एक बाब म्हणजे लव्ह बाइट. प्रेमाच्या नात्यात किंवा वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधादरम्यान लव्ह बाइट फारच कॉमन आहे. यातून त्यांना आनंद मिळतो. अनेकदा पार्टनर अतिउत्साहात शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी लव्ह बाइट देतात. ज्यामुळे त्या भागावर लाल रंगाचा चट्टा दिसतो.

लव्ह बाइटमध्ये एक पार्टनर दुसऱ्याच्या त्वचेवर किस करतो किंवा चावा घेतो. तुमच्यापैकीही बऱ्याच लोकांनी पार्टनरला असा लव्ह बाइट दिला असेल. यात काही चुकीचंही नाही. रोमान्स दरम्यान उत्साह वाढवण्यासाठी असं केलं जातं. पण अनेकदा याचे साइड इफेक्टही बघायला मिळतात. चला जाणून घेऊ लव्ह बाइट कसा नुकसानकारकही ठरू शकतो.

लव्ह बाइट म्हणजे काय?

लव्ह बाइटला 'हिक्की' असंही म्हटलं जातं. ब्लड लीक झाल्याने आणि सेल्स फाटल्याने त्वचेवर पडणाऱ्या डागाला लव्ह बाइट म्हणतात. अशी खूण शरीराच्या नाजूक भागावर जोरात किस केल्याने किंवा चावा घेतल्याने होते. त्वचेवर लाल रंगाची खूण तयार होते. लव्ह बाइटला सामान्यपणे प्रेम आणि विश्वासाची निशाणी मानलं जातं. हा आपल्या पार्टनर प्रति प्रेम व्यक्त करण्याचा एक सामान्य प्रकार आहे. 

लव्ह बाइटचे साइड इफेक्ट

इन्फेक्शनचा धोका

ओरल हर्पीस व्हायरसने पीडित व्यक्तीने आपल्या पार्टनरला लव्ह बाइट दिला तर त्यांच्या पार्टनरच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होऊ शकतात. काही दिवसांनी पार्टनरही या समस्येने ग्रस्त होईल. 

लवकर जात नाही चट्टा

लव्ह बाइटचा चट्टा फारच डार्क असतो. त्यामुळे ते लवकर जात नाही. कपड्यांनी कव्हर नसलेल्या त्वचेवर तर ते अधिक स्पष्ट दिसतात. ज्यामुळे तुम्हाला लोकांच्या नजरेंचा सामनाही करावा लागतो. अनेकदा गोऱ्या लोकांना या गोष्टींचा जास्त सामना करावा लागतो. याचा मानसिक त्रास होऊ शकतो.

स्‍ट्रोकचा धोका वाढतो

तुम्ही विचारही करू शकत नाही, पण लव्ह बाइटमुळे तुम्हाला स्‍ट्रोकही येऊ शकतो. कारण जेव्हा जोशमध्ये पार्टनर त्वचेवर किस करतो किंवा चावा घेतो तेव्हा तेथील रक्त गोठू लागतं. अशा अनेक केसेस बघण्यात आल्या आहेत. ज्यात व्यक्तीच्या नसा तुटतात. यात शरीराला लवकाही मारला जाऊ शकतो.

यांना जास्त होते समस्या

जर त्वचेवर जराही दबाव पडला तर तुमच्या त्वचेवर लगेच निळी किंवा काळी पडत असेल तर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असल्याचा हा संकेत आहे. ज्या लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता होते, त्यांच्या शरीराव लव्ह बाईट लगेच उमटतात. अशात आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी