लॉकडाऊनमध्ये मोबाईलच्या वापराने होतोय 'पिंकी सिंड्रोम' चा प्रसार, जाणून घ्या कसा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 01:02 PM2020-04-08T13:02:04+5:302020-04-08T13:07:20+5:30

स्मार्ट फोनच्या वापरामुळे पिंकी सिंड्रोम ही समस्या वाढत चालली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार देशात अनेक भागात पिंकी सिंड्रोममुळे लोक ग्रासलेले आहेत.

long hours of Mobile using in lockdown can causes Pinky syndrome myb | लॉकडाऊनमध्ये मोबाईलच्या वापराने होतोय 'पिंकी सिंड्रोम' चा प्रसार, जाणून घ्या कसा

लॉकडाऊनमध्ये मोबाईलच्या वापराने होतोय 'पिंकी सिंड्रोम' चा प्रसार, जाणून घ्या कसा

googlenewsNext

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे कोट्यावधी लोक वेगवेगळ्या शहरात आपल्या घरात बंद आहेत. अशा परिस्थीतीत मोबाईलचा वापर सगळ्यात जास्त केला जात आहे. त्यात स्मार्टफोन वापरत असलेल्यांची संख्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.  स्मार्ट फोनच्या वापरामुळे पिंकी सिंड्रोम ही समस्या वाढत चालली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार देशात अनेक भागात सिंड्रोममुळे लोक प्रभावीत आहेत.

तज्ञांच्यामते पिंकी सिंड्रोम ही समान्य समस्या आहे. जास्तवेळ हातात मोबाईल पकडल्यामुळे ही समस्या उद्भवते. या आजारात बोटं वाकडी तिकडी होतात. ही समस्या सगळ्यात लहान असलेल्या बोटाला जास्त उद्भवते. या बोटाला पिंक फिंगर असं सुद्धा म्हणतात. म्हणूनच या आजाराला पिंक सिंड्रोम म्हणतात.
ही तात्पुरत्या स्वरुपाची समस्या आहे. तर काही सर्जनतज्ञांच्यामते एखाद्या व्यक्तीला हातांशी संबंधित कोणताही आजार असेल किंवा हाडांमध्ये समस्या असेल तर हा आजार होऊ शकतो.

लॉकडाऊनमध्ये सिंड्रोमचा वाढता परिणाम

एखादा व्यक्ती ५ ते ६ तास मोबाईलचा वापर करत असेल, तर तोच व्यक्ती लॉकडाऊनमध्ये १० ते १४ तास फोनचा वापर करत आहे. त्यामुळे स्मार्टफोन युजर्समध्ये ही समस्या वाढली आहे. पिंकी सिंड्रोम ही समस्या नसली तरी स्मार्टफोनचा अतिवापर जास्तीत जास्त हातांना आणि डोक्याच्या नसांना प्रभावीत करणारा असतो.

त्यामुळे स्मार्टफोन सतत पकडल्यामुळे मनगट, खांदे आणि हातांचे कोपरे दुखायला सुरूवात होते. कोणतंही जड सामान उचलण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम डोळ्यांवर सुद्धा होतो.  धुसर दिसणं, डोळे दुखणं, चक्कर येणं. डोळ्यांमधून पाणी बाहेर येणं अशा समस्या उद्भवतात.

स्मार्टफोनपासून होत असलेल्या पिंकी सिंड्रोमच्या बचावाचे उपाय 

या सिंड्रोमपासून वाचण्यासाठी सगळ्यात  महत्वाचं आहे ते म्हणजे स्मार्ट फोनचा वापर कमीत कमी करा, मोबाईल फोन नेहमी स्वतःच्या जवळ ठेवू नका, गरजेपेक्षा जास्त फोनचा वापर केल्यामुळे तुम्ही या आजाराला बळी पडू शकता, जास्तवेळ फोनवर बोलायचं असेल तर इअरफोन्सचा वापर करा, हातांची स्ट्रेंचिंग करून व्यायाम करा. त्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहिल.

Web Title: long hours of Mobile using in lockdown can causes Pinky syndrome myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.