शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

ऑफिसला जाण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त प्रवास करता? मग तुमच्यासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 15:28 IST

तासाभरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना शारीरिक व्याधी होण्याचा धोका

अनेक महानगरांमध्ये ऑफिस गाठण्यासाठी दररोज कर्मचाऱ्यांना मोठा प्रवास करावा लागतो. मुंबईसारख्या शहरांमध्ये तर पनवेल, कर्जत, कसारा, विरारसारख्या भागांमधून लोक कामासाठी येतात. गर्दीमुळे हा प्रवास दिवसागणिक धकाधकीचा होत आहे. याशिवाय या प्रवासाचे गंभीर परिणाम भविष्यात शरीरावर होऊ शकतात, असा धोक्याचा इशारा एका सर्वेक्षणातून देण्यात आला आहे. जास्त काळ प्रवासात घालवणाऱ्यांना झोपेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.आठवड्याला ४० तासांपेक्षा जास्त वेळ काम करणाऱ्या आणि दिवसाकाठी तासाभरापेक्षा जास्त काळ प्रवास करणाऱ्यांना थकवा येण्याचं प्रमाण २५ टक्के इतकं असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना थकव्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता जास्त असते. या व्यक्तींच्या शारीरिक हालचाली कमी होतात. त्यामुळे विविध व्याधी जडण्याचा धोका वाढत जातो. याशिवाय १६ टक्के लोकांना झोपेशी संबंधित आजार होण्याचादेखील धोका असतो. स्टॉकहोम विद्यापीठाच्या आणि हेलसिंकीमधल्या आरोग्य आणि कल्याण विभागाच्या जॅना हालोनेन यांनी ही माहिती दिली आहे. दिवसभरातला बराचसा कालावधी कामात आणि प्रवासात गेल्यानं कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांचं शरीर निष्क्रीय होत जातं आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी कराव्या लागणारे व्यायाम करणं ते टाळू लागतात. यामुळे शरीराशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यता वाढते. अनेकांचं दिवसभराचं वेळापत्रक त्यांच्या कामाच्या वेळापत्रकावरुन ठरतं. त्यामुळे ऑफिस आणि प्रवासासाठी लागणाऱ्या कालावधीचा थेट संबंध आरोग्याशी असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. यासाठी २००८ ते २०१८ या कालावधीत २२ हजार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. दहा वर्षांच्या कालावधीत दोनवेळा त्यांच्या कामाची, प्रवासाला लागणाऱ्या वेळेची, झोपेची, मद्यसेवनाची, धूम्रपानाची माहिती घेण्यात आली. याशिवाय त्यांचं बॉडी मास इंडेक्सदेखील विचारात घेण्यात आलं. याबद्दलचं सर्वेक्षण करताना सरासरी ४८ वर्षांच्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला.