LMOTY 2026 : वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉ. ज्ञानदेव चोपडे यांचा लोकमतकडून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 19:43 IST2026-03-10T19:32:43+5:302026-03-10T19:43:24+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2026: गेल्या २२ वर्षांपासून दुर्मिळ अनुवांशिक आजारांवर उपाय शोधण्यासाठी कार्य करणाऱ्या डॉ. चोपडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

LMOTY 2026 : वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉ. ज्ञानदेव चोपडे यांचा लोकमतकडून गौरव
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2026: महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि चर्चेत असणारा बहुप्रतिक्षित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ हा सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान, विकी कौशल यांसह राज्यभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात मुंबई वगळता उर्वरित राज्य या विभागातून डॉ. ज्ञानदेव चोपडे यांना सर्वोकृष्ट कामगिरीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ Live पाहण्यासाठी क्लिक करा
डॉ. ज्ञानदेव चोपडे हे एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय, धामणगाव येथे शरीरचना शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून अध्यापन करतात. गेल्या २२ वर्षांपासून दुर्मिळ अनुवांशिक आजारांवर त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे १५,००० रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी सेवा दिली आहे. डाऊन सिंड्रोम केअर असोसिएशनचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत. मागील २० वर्षांपासून डाउन सिंड्रोम असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध सशक्तीकरण कार्यक्रमांद्वारे ते मदत करत आहेत.
सध्या सुमारे ३०० कुटुंबीयांना आठवड्यातून एकदा मोफत सल्ला देण्याचे समाजकार्य ते करतात. सर्वसामान्य जनतेसाठी अनुवंशशास्त्र विषयावर २०० पेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये १०० पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी दिली आहेत. “क्रोमोझोल व्हेरिएशन्स” या पुस्तकाचे ते लेखक आहेत. हे पुस्तक स्कोलहर्स प्रेस, जर्मनीद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम चालवत आहेत.
ते मागील २५ वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS आणि PG विद्यार्थ्यांना जेनेटिक्स व भ्रूणशास्त्र शिकवत आहेत. ते दुर्मिळ अनुवांशिक आजारांमध्ये डॉक्टरांचे प्रशिक्षण (ऑनलाइन) देत आहेत. त्यांनी संरचित १२ महिन्यांच्या कार्यक्रमाद्वारे आतापर्यंत सुमारे १२० डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. पीएचडी (वैद्यकीय जनुकशास्त्र) – ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. रुग्णालय दरवर्षी “वर्ल्ड डाउन सिंड्रोम डे” निमित्त उपक्रम राबवते. त्यात पालक सक्षमीकरण कार्यक्रम, विशेष आरोग्य तपासणी शिबिरे, पालक-तज्ज्ञ संवाद, पालक-पालक संवाद ते आयोजित करत असतात.