उन्हाळ्यामध्ये जेव्हा पारा 40च्या आसपास पोहोचतो. त्यावेळी अंगाची अगदी लाहीलाही होते. अशातच पंखा किंवा कूलरही काही करू शकत नाही. अशातच एयर कंडिशनर म्हणजेच एसी हा एकमेव उपाय असतो. आपण दिवसभर सेंट्रलाइज्ड एसी ऑफिसमध्ये असतो आणि रात्रीसुद्धा एसीमध्येच झोपतो. हैराण करणाऱ्या उकाड्यापासून शांतता देणारा एसी हवाहवासा वाटला तरिही हा आरोग्याला अत्यंत नुकसान पोहोचवतो. जाणून घेऊया सतत एसीमधये राहिल्याने आरोग्यासोबतच सौंदर्याच्या होणाऱ्या समस्यांबाबत...

(Image Credit :AE Building Systems)

ताज्या हवेपासून दूर रहावं लागतं 

एसी सुरू करताना आपल्याला दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे एसीची हवा बाहरे न जाता त्या खोलीतच राहते आणि तेथील वातावरण थंड राहते. अशातच आपल्यापर्यंत ताजी हवा पोहोचत नाही, जी आरोग्याला नुकसान पोहोचवणारी असते. त्यामुळे सतत थकवा जाणवतो. एसीचा डक्ट स्वच्छ नसेल तर तुम्हाला श्वासाशी निगडीत समस्या आणि लंग इन्फेकशन होऊ शकतं. 

(Image Credit : Live Science)

अत्यंत थंड वातावरण 

अनेकदा आपण झोपलेले असतो, तेव्हा तापमान फार थंड होतं. पण जेव्हा आपण जागे असतो तेव्हातरी आपण ते मन्टेन करू शकतो. परंतु झोपलेलं असताना अनेकदा हे आपल्या आरोग्याच्या सहन करणाऱ्या क्षमतेपेक्षा कमी होते. थंडाव्यामुळे डोकेदुखी आणि पाठदुखी यांसारख्या समस्या होऊ शकतात. गरजेपेक्षा जास्त थंडाव्यामुळे सांधेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. 

कोरडपणा 

एयर कंडिशनर हवेमधील ओलावा शोषून घेतो. एवढचं नाही तर हे आपली त्वचा आणि केसांचा ओलावा शोषून घेतात. ज्यामुळे स्किन आणि केस ड्राय होतात. एवढचं नाही कमी वायातच वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. तसेच यामुळे त्वचेशी निगडीत समस्या होऊ शकतात. 

करा हे उपाय 

तुम्ही ऑफिसचा एसी बंद करू शकत नाही. परंतु स्वतःला एसीची सवय लावून घेऊ नका. घरीदेखील कमीत कमी एसी लावा आणि तापमान नॉर्मल ठेवा. एसीमध्ये बसल्यानंतर त्वचेवर सतत मॉयश्चरायझर लावा. 

जास्त पाणी प्या 

एसीमध्ये बसल्यानंतर सतत पाणी पित रहा. ऑफिसमध्ये असाल तर मध्येमध्ये उठून अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला फ्रेश वातावरणात राहता येईल. ऑफिसनंतर संध्याकाळी किंवा सकाळी पार्कमध्ये फिरण्यासाठी जा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 


Web Title: Lifestyle side effects of air conditioners on health and skin see home remedies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.