शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बेडवर बसून जेवण करता? डॉक्टरांनी सांगितलेलं वाचल्यावर तुम्ही चुकूनही असं करणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 15:48 IST

24 वर्षीय एका व्यक्तीला बेडवर बसून जेवण्याची सवय होती. अनेकदा अन्नाचे काही कण बेडवर सोडत होता. वरून वरून स्वच्छता होत होती, पण बेडच्या आत काही कण तसेच राहत होते.

लहानपणापासून आपण घरातील मोठ्यांकडून ऐकत असतो की, जेवण नेहमी स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसून करावं. खाली मांडी घालून बसून जेवण्याला आयुर्वेदातही फार महत्व देण्यात आलं आहे. अशात शास्‍त्रांनुसार, बेडवर बसून जेवण केल्यास अन्नाचा अपमानही होतो. कारण बेड ही झोपण्याची जागा आहे. तरीही बरेच लोक बेडवर बसून जेवण करतात. त्यांना ते आरामदायक वाटतं. पण एका डॉक्टरने याबाबत एक इशारा दिला आहे.

सिंगापूरचे डॉक्टर सॅम्युअल यांनी टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आणि याचं पूर्ण कारण सांगितलं. ते म्हणाले की, नुकतंच मला एका घटनेबाबत समजलं. 24 वर्षीय एका व्यक्तीला बेडवर बसून जेवण्याची सवय होती. अनेकदा अन्नाचे काही कण बेडवर सोडत होता. वरून वरून स्वच्छता होत होती, पण बेडच्या आत काही कण तसेच राहत होते. झालं असं की, एक दिवस त्याच्या कानात जोरात वेदना झाली. इतकी वेदना की, त्याला असह्य झालं होतं. कुटुंबिय त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी चेक केलं तर कानाच्या आत 10 पिल्लांसह कॉकरोज म्हणजे झुरळ फिरत होते. जे त्याच्या कानाला आतून कुरतडत होते. जे बघून डॉक्टरही हैराण झाले.

घाबरण्याऐवजी सॅमुअल यांनी लोकांना सूचना केली की, ही एक रेअर घटना आहे. पण कुणासोबतही असं होऊ शकतं. जगातील अनेक देशातून अशा घटना समोर आल्या आहेत. अनेकदा तर कानांचा पडदाही फाटला आणि व्यक्ती बहिरे झाले. एंटोमोलॉजिस्ट कोबी शाल यांनी 'द वर्ज' ला सांगितलं की, झुरळ किंवा कोणत्याही कीटकासाठी मनुष्यांचे कान सगळ्यात सुरक्ष‍ित जागा आहे. कारण तुम्ही तिथे त्यांना सहजपणे मारू शकत नाहीत. दुसरं असं की, त्यांना हे ठिकाण एखाद्या खोप्यासारखं दिसतं.

तुम्हाला वाचून धक्का बसेल की, कानातून येणारा गंध कीटकांना आकर्षित करतो. ईअर वॅक्स म्हणजे कानातील मळाचा जो गंध असतो, तो ब्रेड, पनीर आणि बीअरमध्ये आढळणाऱ्या फॅटी अॅसिडमधून निघतो. झुरळ तुम्ही गाढ झोपेत असताना सहजपणे तुमच्या कानात शिरू शकतात. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला काही असहज जाणवलं तर सगळ्यात आधी कानात ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाका. यात हायड्रोजन पॅराक्‍साइड असतं. ज्यामुळे कीटक बाहेर येतात. पण हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टिकटॉक यूजर्स डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकून हैराण झाले आहेत. अशात बेडवर जेवणं बंद केलं तर नुकसान टळू शकतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य