शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या 'या' चुकांमुळे तुम्ही होऊ शकता गंभीर आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 10:58 IST

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना  कामाचा, अभ्यासाचा व्याप इतका वाढलेला असतो की या सगळ्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही.  

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना  कामाचा, अभ्यासाचा व्याप इतका वाढलेला असतो की या सगळ्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही.  खाण्यापिण्याची म्हणजे तुमच्या रोजच्या जेवणाची, नाष्त्याची आणि झोपेची वेळ निश्चीत नसणे हे खुपच कॉमन  आहे. पण तुमच्या याच सवयी तुम्हाला महागात पडू शकतात.एका सुदृढ आणि चांगल्या शरीरासाठी पौष्टीक आहार घेणं फार महत्वाचं असतं.  आहार हा दिवस उगवल्यापासून  रात्री झोपेपर्यंत उर्जा देत असतो.  कारण हाडांना आणि मासपेशींना मजबूत करण्यासाठी आपण काय खातो ते महत्वाचं असतं.  

अनेकदा महिलांना तसंच पुरूषांना घरातील आणि ऑफिसची कामं  संपेपर्यंत उशीर होत असतो. परिणामी जेवायला तसचं झोपायला उशीर होतो. त्यानंतरही असंख्य लोकं जेवण झाल्यानंतर झोप येईपर्यंत मोबाईलचा वापर करत असतात. त्यामुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होत असतो. पण तुमच्या सवयी जीवघेण्यासुद्धा ठरू शकतात. (हे पण वाचा:वाढतं वय लपवण्यासाठी महिला करतात फ्रिक्शन थेरेपीचा वापर, जाणून घ्या या थेरेपीबद्द्ल)

(image credit- healthline)

अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की  रात्री उशीरापर्यंत काम केल्यामुळे  तुम्हाला हृदयाशी संबंधीत आजार होण्याचा धोका वाढतो. कारण त्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढतं तसंच कॉलेस्ट्रॉल सुध्दा वाढतं. ज्या लोकांना रात्री उशीरापर्यत जेवण्याची सवय असते.  त्यांना या आजारांचा धोका जास्त जाणवतो. रात्री उशीरापर्यंत जागून काम केल्याने किंवा रात्री  उशीरा जेवल्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. त्यामुळे तुमचं वजन वाढतं. (हे पण वाचा:ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल)

कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे हद्यावर ताण येत असतो.  त्यामुळे  भविष्यात ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. याचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया करावी लागत असते. तज्ञांच्यामते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारतशक्ती कमी होण्याचे  कारण तुमची झोप पूर्ण न  होणे  हे असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो.  त्यामुळे आजारांपासून लांब राहण्यासाठी रात्री उशीरा जेवणं टाळा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य