जाणून घ्या काय आहे हीमोफीलिया?; छोटीशी जखमही ठरू शकते जीवघेणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 11:08 AM2019-08-08T11:08:48+5:302019-08-08T11:10:23+5:30

तुम्हाला थोडीशी जरी जखम झाली आणि रक्त येत असेल तर ते रक्त अनेक उपायानंतरही थांबत नाही का? मग तुम्हाला हीमोफीलिया असू शकतो. हीमोफीलिया एक आनुवांशिक आजार आहे.

Know what is hemophila disorder and what are the causes of this disease | जाणून घ्या काय आहे हीमोफीलिया?; छोटीशी जखमही ठरू शकते जीवघेणी

जाणून घ्या काय आहे हीमोफीलिया?; छोटीशी जखमही ठरू शकते जीवघेणी

googlenewsNext

तुम्हाला थोडीशी जरी जखम झाली आणि रक्त येत असेल तर ते रक्त अनेक उपायानंतरही थांबत नाही का? मग तुम्हाला हीमोफीलिया असू शकतो. हीमोफीलिया एक आनुवांशिक आजार आहे. ज्यामध्ये थोडं लागल्यानंतरही रक्त येत राहतं. मग कितीही उपाय केले तरी रक्त थांबत नाही. अशातच जर अपघात झाला किंवा एखादा गंभीर आजार झाला आणि त्या व्यक्तीला हीमोफीलिया असेल तर त्याच्या जीवावरही बेतू शकतं. कारण या आजारामध्ये रक्त थांबत नसल्यामुळे बरचं रक्त वाहून जातं आणि शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतं. 

हीमोफीलिया होण्याची कारणं

तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, हीमोफीलिया होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, रक्तामध्ये असणारी प्रोटीनची कमतरता. ज्यामुळे क्लॉटिंग फॅक्टरवर परिणाम दिसून येतो. शररीराला जखम झाल्यानंतर रक्त थांबवण्यासाठी क्लॉटिंग फॅक्टर मदत करतं. दरम्यान हीमोफीलियाचे तीन प्रकार आहेत... ए, बी आणि सी. 

हीमोफीलियावर उपचार 

हीमोफीलियाचा प्राथमिक उपचार फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी आहे, ज्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टरला रिप्लेस करण्याचं काम केलं जातं. या थेरपीमध्ये ब्लड प्लाजमाला एकत्र करून ते शुद्ध केले जातात. 

हीमोफीलिया असलेल्यांनी अशी घ्यावी काळजी 

हीमोफीलियाचे रूग्णांना नेहमी असा सल्ला देण्यात येतो की, त्यांनी हाडं आणि स्नायू बळकट करण्यासाठी असणाऱ्या व्यायाम प्रकारांचा आपल्या दैनंदिन जीवनात सहभाग करावा आणि आपलं वजनावरही नियंत्रण ठेवावं. तसेच रूग्णांनी स्वतःच आपली काळजी घ्यावी. अशा कृतींपासून स्वतःला दूर ठेवावं, ज्यांमुळे त्यांना इजा होऊ शकते. तसेच जर ब्रश करताना रूग्णांच्या दातातून रक्त येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि दात घासण्यासाठी सॉफ्ट टूथब्रशचा वापर करावा. तसेच वेळोवेळी डॉक्टरांकडून रूटिन चेकअप करायला विसरू नका. 

हीमोफीलिया असलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या मनाने कोणतीही औषधं घेऊ नये. तसेच ब्लड थिनिंगसारखी औषधं म्हणजेच, वार्फरिन आणि हेपरिन ही औषधंही कटाक्षाने टाळावी. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांकडून चेकअप करून घ्या. तसेच कोणताही उपाचार डॉक्टरांच्या सल्लानेच करा. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Know what is hemophila disorder and what are the causes of this disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.