(Image Credit : Verywell Mind)
अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक आत्महत्या करण्याच्या अनेक घटना आपण सतत ऐकत-वाचत असतो. पण हे नेमकं होतं कसं? आत्महत्या करण्यापर्यंत त्यांचा विचार जातो कसा? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. बायपोलर डिसऑर्डर हा एक असा मानसिक आजार आहे, ज्याने व्यक्तीचा मूड सतत बदलत राहतो. मूडमध्ये होणारे हे बदल सामान्य श्रेणीत येत नाहीत. या डिसऑर्डरने पीडित व्यक्ती अनेक महिने डिप्रेशनचे शिकार राहू शकतात किंवा फार जास्त काळ एंग्झायटीच्या(चिंता) स्थितीत राहू शकता.
काय आहेत लक्षणे?
mayoclinic.org या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, बायपोलर डिसऑर्डरने पीडित व्यक्तीमध्ये तीन मुख्य लक्षणे दिसू शकतात. बायपोलर डिसऑर्डरने पीडित व्यक्तींमध्ये दिसणारी तीन मुख्य लक्षणे म्हणजे मॅनिया (mania), दूसरं हायपोमॅनिया (hypomania)आणि तिसरं डिप्रेशन.
१) मॅनिया स्थितीत व्यक्ती इमोशनल रूपाने फार संवेदनशील होतो. भावनांवर त्यांचं जास्त नियंत्रण राहत नाही. त्यामुळे फार जास्त उत्तेजित, आवेग, फार जास्त आनंद आणि ऊर्जा त्यांना फार जास्त जाणवते. मॅनिया स्थितीदरम्यान व्यक्तीच्या कार्य आणि नात्यांवर सर्वात जास्त प्रभाव बघायला मिळतो.
२) हायपोमॅनिया ही मॅनियापेक्षा कमी थोडी खालची स्थिती आहे. याला जास्त करून बायपोलर २ डिसऑर्डर म्हटलं जातं. या स्थितीमध्येही व्यक्ती मूडमध्ये फार बदल बघायला मिळतात. पण या स्थितीत व्यक्तीच्या कार्य आणि नाती मॅनेज करण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडत नाही.
३) डिप्रेशनच्या स्थितीची व्यक्तीमध्ये फार जास्त उदास, निराश, ऊर्जेची कमी, वेगवेगळ्या गोष्टींमधील रस कमी होणे, फार जास्त किंवा कमी झोपे ही लक्षणे बघायला मिळतात. अशात व्यक्तीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार देखील येऊ शकतो. अशात या लक्षणांची ओळख लवकर पटवणे गरजेचं आहे.
उपचार
बायपोलर डिसऑर्डरने पीडित व्यक्तीला डॉक्टरच्या उपचारांची आवश्यकता असते. लक्षणे दिसायला लागली तर वेळीच पीडित व्यक्तीला डॉक्टरांकडे घेऊन जावे. जेणेकरून स्थिती हातातून बाहेर जाऊ नये. सामान्यपणे या आजाराने पीडित व्यक्तींना आयुष्यभर औषधांचा आधार घ्यावा लागतो. औषधांचा डोज किती जास्त किंवा कमी असेल हे डॉक्टरांकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या टेस्टवर अवलंबून असेल.