know the symptoms and causes of Proteus Syndrome myb | 'या' वयात अवयवांचा आकार वाढल्याने प्रोटीस सिंड्रोमचा असू शकतो धोका, जाणून घ्या लक्षणं

'या' वयात अवयवांचा आकार वाढल्याने प्रोटीस सिंड्रोमचा असू शकतो धोका, जाणून घ्या लक्षणं

मुलांच्या आरोग्याची काळजी सगळ्याच पालकांना असते. लहान वयात मुलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं मोठ्या आजाराचं कारण ठरू शकतं. काहीवेळा  लहान मुलांच्या मोजक्या अवयवांचा आकार वाढत जातो. अशाच एका आजाराबद्दल सांगणार आहोत. प्रोटीस सिंड्रोम या आजारात वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू, हाडं, धमन्यांना सुज येते.  हा आजार अनुवांशिक सुद्धा असू शकतो. 

हा आजार लहान मुलांना सगळ्यात जास्त होतो.  या आजारात अनुवांशिक परिवर्तन दिसून येतं. जन्म झाल्यानंतर मुल व्यवस्थित दिसतं. पण १८ महिन्यांचा झाल्यानंतर लक्षणं दिसायला सुरूवात होते. या स्थितीत बाळाचा जसजसा विकास होत जातो. तसतसं शारीरिक अवस्था खराब होत जाते.

प्रोटीस संड्रोमची कारण

हा आजार अनुवांशिक असतो. अनियमीत रुपाने वाढत जाणारा असतो.  त्यामुळे जीन्समध्ये म्यूटेशन झाल्यानंतर गंभीर स्वरुपाची समस्या निर्माण होते. यात मासपेशी, हाडं, त्वचा, लिंम्फॅटिक नोड्स आणि रक्तवाहिन्यांवर प्रभाव पडतो.

लक्षणं

या आजाराची लक्षणं ६ ते १८ महिन्यांमध्ये दिसून येतात. यात अवयवांची वाढ योग्यप्रकारे होत नाही. एक भाग लहान तर दुसर मोठा अशाप्रकारे वाढ होते. आर्टिरियोवेनस मैलफॉर्मेशन, बौद्धिक अकार्यक्षमता, डोळ्यांना काहीही न दिसणे ही लक्षणं दिसतात. तसंच हा आजार झालेल्या व्यक्तीला वाढत्या वयात कॅन्सर, ट्यूमर किंवा नसांची संबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. या आजारावर कोणताही उपाय नाही. या आजारांच्या लक्षणांना प्रतिबंध घालण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न केले जाऊ शकतात. काहीवेळा सर्जरी  करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. 

Web Title: know the symptoms and causes of Proteus Syndrome myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.