हाडांमधून आवाज येत असेल तर 'या' गंभीर आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 11:11 AM2020-02-29T11:11:10+5:302020-02-29T11:11:14+5:30

अनेकदा रिकाम्या वेळात किंवा बसल्याबसल्या आपण जेव्हा बोट मोडत असतो. तेव्हा हाडांमधून आवाज येत असतो. हाडांशी जोडलेल्या आजारांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष ...

know the symptoms and causes of osteoarthritis myb | हाडांमधून आवाज येत असेल तर 'या' गंभीर आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

हाडांमधून आवाज येत असेल तर 'या' गंभीर आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

अनेकदा रिकाम्या वेळात किंवा बसल्याबसल्या आपण जेव्हा बोट मोडत असतो. तेव्हा हाडांमधून आवाज येत असतो. हाडांशी जोडलेल्या आजारांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करत असतो.  हाडांमधून कट-कट असा आवाज येतो. त्याला मेडीकलच्या भाषेत 'क्रेपिटस' असं म्हणतात.  अनेकदा उठताना किंवा बसताना असा आवाज येत असतो. ३० ते ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोकसुद्धा या समस्येचा सामना करत असतात.

या समस्येचं सगळ्यात महत्वाचं कारण कॅल्शियमची कमी असणं हे आहे. यामुळे शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. त्यात दूध, डाळी आणि वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असतो. 


काय आहे ऑस्टियोअर्थराइटिस?

गुडघ्यातील  गाठींमधिल सगळ्यात कॉमन असलेला असा हा प्रकार आहे.  हा प्रकार सगळ्यात जास्त ५० वर्षांनंतरच्या वयात जास्त दिसून येतो. यात हाडांचं दुखणं, हाडांमध्ये गॅप असणं असा त्रास होतो.मेनोपॉजमुळे गुडघ्यांमधिल कार्टीलेज हळूहळू संपत असतं.  कधीकधी हे दुख जास्त वाढत जातं त्यावेळी  चालण्याफिरण्यासाठी सुद्धा त्रास होत असतो. महिलांना  वयाची  ४० वर्ष पूर्ण झाल्यानंतर मेनोपॉजच्या अवस्थेत ही समस्या सर्वाधीक जाणवते. कमी वयात सुद्धा तुम्हाला असा त्रास होत असेल तर वेळीत सावध होणं गरजेचं आहे.   कारण जर तुमच्या गुडघ्यातून आवाज येत असेल तर कॅल्शियमची  कमतरता भासून हा आजार होण्याची शक्यता असते. जाणून घ्या काय आहेत लक्षणं

लक्षणं

गुडघ्यांमध्ये दुखणं

लिगमेंट्सशी संबंधीत आजार 

व्हिटामीन डी-३ ची कमतरता जाणवणे

डाडं वाकडी होणे

हाडांना सुज येणे

या आजारांपासून वाचायचं असेल तर हे करा उपाय 

 रोज व्यायाम करा

कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवा. दुध आणि अंड्यांचे सेवन 

सकाळचं कोवळं ऊन घ्या. 

सुजलेल्या जागांवर बर्फाच्या पाण्याने शेका.

क्रिम लावून हलक्या हाताने मसाज करा. 

सुज आली असल्यास  गरम पाण्याने शेकून घ्या. ( हे पण वाचा-लघवी थांबवून ठेवाल तर 'या' आजारांना पडाल बळी, जाणून घ्या किती वेळा लघवीला जाणं गरजेचं?)

बदलत्या जीवनशैलीत वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. कमी वयातचं शरीराच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवणं हे आपली कार्यक्षमता कमी करू शकतं. त्यामुळे तुम्हाला जर या आजारांपासून दूर रहायचं असेल तर या उपायांचा वापर करून स्वतःला चांगले ठेवा. ( हे पण वाचा-ऊसाच्या रसाने कॅन्सर, किडनी स्टोनसह अनेक गंभीर आजारांचा टळेल धोका!)

Web Title: know the symptoms and causes of osteoarthritis myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.