तांब्याची भांडी वापरल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 12:12 PM2019-12-27T12:12:26+5:302019-12-27T12:12:32+5:30

पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा अनेकदा वापर केला जातो.

Know not only benefits there are also disadvantages of copper utensil | तांब्याची भांडी वापरल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी हे नक्की वाचा

तांब्याची भांडी वापरल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी हे नक्की वाचा

googlenewsNext

पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा अनेकदा वापर केला जातो. सगळ्यात जास्त तांब्याच्या भांड्यांचा वापर भारतात केला जातो. तुम्हाला आत्तापर्यंत  तांब्याच्या  भांड्यांचा वापर करण्याचे अनेक फायदे माहीत असतील पण तांब्याच्या भांड्यांचा वापर केला तर नुकसान सुद्दा होऊ शकतं चला तर मग जाणून घ्या तांब्याची भांडी वापरल्याने कोणत्या प्रकारचं नुकसान होत असतं. 

तांब्याच्या भांड्यांना विशेष महत्व प्राप्त झालं आहे. किटाणूनाशक असल्यामुळे तांब्याच्या भांड्यांचा पाणी पिण्यासाठी वापर केला जातो. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्याने पित्त, वात, कफ यांसारख्या समस्या दुर होतात. तसंच यासाठी तांब्याच्या भांड्यात ८ तास पाणी ठेवणं आवश्यक आहे.  तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवल्यास लवकर  खराब होत नाही. पण या भांड्याचा खाण्यापिण्यासाठी  वापर करत असाल तर त्यापासून होणारे नुकसान सुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. एका अभ्यासानुसार तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने त्यातील अशुध्दता दूर होते. त्यातील विषाणू हे नाहीसे होतात. 

रोज सकाळी संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होतील आणि आराम मिळेल. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे कॅन्सरशी लढण्यात सहायक ठरतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी राहतो. अ‍ॅसिडिटी,गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. आयुर्वेदानुसार जर तुम्हाला शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याची इच्छा असेल तर तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे पाचन क्रिया व्यवस्थित राहते.

तांब्याच्या भांड्यांचा वापर करताना काही गोष्टींचा काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक लोकांच्या घरात तांब्याच्या भांड्याचा वापर करताना ग्लास किंवा जग वापरला जातो जर तुम्ही पाणी  पिण्याआधी तांब्याची भांडी जमीनीवर ठेवायची चूक करत असाल तर त्या पाण्यातील पोषक तत्व तुम्हाला मिळणार नाहीत.

तांब्याच्या भांड्यांचा काही काळ वापर केल्यानंतर  त्याला काळपटपणा येतो. भांड्यांवर थर जमा झाल्यास त्याचा पाण्याशी थेट संपर्क येत नाही. त्यामुळे वापर करण्याआधी  तांब्याचं भांड स्वच्छ धुतलेलं असणं गरजेचं आहे. हिवाळ्यात जर तांब्याची भांडी व्यवस्थित न धुता त्याचा वापर कराल तर महागात पडू  शकतं. कारण त्यावर वेगळ्या प्रकारचा थर जमण्यास सुरूवात होते. हे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे तर तुम्ही  तांब्याची भांडी वापरत असाल तर त्यांची स्वच्छता ठेवणं सुध्दा तितकचं महत्वाचं आहे. 

Web Title: Know not only benefits there are also disadvantages of copper utensil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.