मासिक पाळीच्या वेदना सहन होत नाहीत? तर 'या' उपायांनी दर महिन्याची समस्या होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 04:38 PM2019-12-02T16:38:38+5:302019-12-02T17:31:00+5:30

मासिक पाळिच्या दरम्यान प्रत्येक महिलेला प्रचंड वेदना होत असतात.

Know how to prevent from menstrual pain | मासिक पाळीच्या वेदना सहन होत नाहीत? तर 'या' उपायांनी दर महिन्याची समस्या होईल दूर

मासिक पाळीच्या वेदना सहन होत नाहीत? तर 'या' उपायांनी दर महिन्याची समस्या होईल दूर

googlenewsNext

मासिक पाळिच्या दरम्यान प्रत्येक महिलेला प्रचंड वेदना होत असतात. कोणाच्या छातीमध्ये जडपणा येतो. तर कोणाच्या पायाच्या पोटऱ्या दुखतात. काही जणींना मासिक पाळी येण्याआधी काही दिवस आधी चेहऱ्यावर पुळ्या येतात. डोकेदुखीचा त्रास होतो तर काहींना मासिक पाळी सुरू असताना पोटात असह्य वेदना होतात. कंबर सुध्दा दुखत असते. कॉलेज आणि कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी हा त्रास सहन करणं फारच कठीण असतं. फार कमी महिला असतील ज्यांना मासिक पाळी सुरू असताना त्रास होत नाही. बाकी सगळ्या मुलींना मासिक पाळिच्या चार दिवसात अंगदुखीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कामात लक्ष लागत नाही, सतत चिडचिड होते. यासाठीच मासिक पाळीच्या त्रासावर घरगुती उपाय कोणते करावेत हे जरूर जाणून घ्या. ज्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान त्रास होणार नाही.

(image credit- India today)

मासिक पाळी सुरू होण्याआधी, मासिक पाळी सुरू झाल्यावर काही दिवस कोमट पाणी प्या. ज्यामुळे तुमचे पोट दुखणे कमी होईल. दिवसभरातुन दहा ते बारा ग्लास पाणी प्या. पाळी सुरू असताना त्या ५ दिवसात आरामदायक कपडे वापरा. अती घट्ट कपडे वापरल्यामुळे तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो. पॅड्स वेळच्या वेळी बदला. जर बराच वेळ पॅड बदलला नाही तर ईन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

(Image credit-Womenhealthgov)

मासिक पाळी सुरू असताना मांसाहार करणं टाळा .मासिक पाळी सुरू असताना पपई खाण्याने रक्तस्त्राव चांगला होतो ज्यामुळे वेदना कमी होतात. पण योग्य प्रमाणात खायला हवी जास्त खाल्ल्यास रक्तस्त्राव जास्त होण्याची शक्यता असते. दर महिन्याच्या या चार ते पाच दिवसात पालेभाज्या अधिक प्रमाणात खाव्यात.

(image credit- Medlife)

या दिवसात पुरेशी किमान ८ तास झोप झोप घ्या. कारण नीट झोप झाली. तरच शरीराला  आराम मिळतो. आणि वेदना कमी होतात. नारळपाणी प्यायल्याने कमरेला आराम मिळतो. आणि पोटदुखी नियंत्रणात राहते. या दिवसांमध्ये चहा कॉफीचे सेवन कमी करावे. शक्यतो वेदना कमी करण्याकरीता गोळ्या घेणे टाळा. गोळ्या घेतल्याने पाळी सुरू असताना स्त्राव कमी होण्याची शक्याता असते. आणि आरोग्यावर त्याचा वाईट परीणाम होतो.

Web Title: Know how to prevent from menstrual pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.