शिळा भात खात असाल तर जाणून घ्या नुकसान आणि फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:04 AM2020-01-27T10:04:25+5:302020-01-27T10:08:51+5:30

अनेकदा घरी काही पदार्थ तयार केल्यानंतर जेवणाच्या वेळेला पूर्ण संपत नाही.

Know the disadvantages and benefits of eating cold rice | शिळा भात खात असाल तर जाणून घ्या नुकसान आणि फायदे

शिळा भात खात असाल तर जाणून घ्या नुकसान आणि फायदे

googlenewsNext

अनेकदा घरी काही पदार्थ तयार केल्यानंतर जेवणाच्या वेळेला पूर्ण संपत नाही. मग उरलेले शिळे अन्न खाल्ले जाते. खासकरून अनेक महिला या अन्न वाया जाऊ नये म्हणून आदल्या दिवशीचे किंवा रात्रीचे अथवा दुपारचे शिळे अन्न खातात. पण शिळा भात खाताना तुम्ही कधी विचार केलाय का की त्याचे काय फायदे किंवा तोटे असतील तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत शिळ्या भाताचे फायदे आणि तोटे.

Image result for RICE

ब्राऊन राईस किंवा व्हाईट राईस अनेक लोक आपल्या डाएटनूसार खात असतात. काही लोक गरम भात न खाता थंड किंवा शिळा खातात.  जो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर सुद्धा असतो आणि नुकसानकारक सुद्धा असतो. शिळ्या भातात नुकत्याच शिजवलेल्या भाताच्या तुलनेत अधिक प्रमाणात स्टार्च असतात. काही वेळा मोठ्या प्रमाणात असेलेले स्टार्च पचवण्यासाठी शरीर तयार नसतं.  त्याचे रूपांतर बॅक्टीराया मध्ये सुद्धा होऊ शकते.

Related image
शिळा भात खाण्याचे फायदे

Related image

फर्मेंटेड प्रक्रिया शॉर्ट चेन फॅटी एसिड्स निर्माण करातात. त्यामुळे शरीरातील  दोन हार्मोन्स सक्रिय असतात.

ग्लूकागन आणि पेप्टईट  जो तुमच्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी लठ्ठपणाविरोधक असलेल्या हार्मोन्सचे काम केले जाते. 

आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा फायदेशीर असते.

कॉलेस्टॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी शिळ्या भाताचे सेवन फायदेशीर ठरत असते.

शिळा भात खाल्यामुळे होणारे नुकसान

Image result for RICE

शिळा आणि पुन्हा गरम केल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पोटदुखी, उलटी होणे,  जुलाब होणे, अपचनाचा त्रास अशा समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. 

बेसिलस सेरेस हे सर्वसाधारणपणे मातीत तयार होणारा एक विषाणू आहे जो भातासुद्धा काहीवेळा तयार होत असतो. जो कच्च्या आणि शिळ्या भाताला दुषित करत असतो. 

शिळ्या भाताचे सेवन वारंवार केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्याचा धोका असतो. हा त्रास लहानांनाच नाही तर महिलांना आणि पुरूषांना  सुद्धा होत असतो. ( हे पण वाचा-प्रदुषणामुळे वाढतोय जीवघेण्या टीबी चा धोका, जाणून घ्या बेसिक कफ मॅनेजमेंटचा इफेक्टीव्ह उपाय)

Related image

जर तुम्हाला योग्य पध्तीने भाताचं सेवन करायचं असेल तर एका तासाच्या आत थंड करून  एका भांड्यात काढून ठेवा. भात थंड करण्यासाठी तुम्ही हवाबंद डब्याचा वापर सुद्धा करू शकता. उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवत असताना फक्त १ दिवस ठेवावा. यापेक्षा अधिक दिवस फ्रिजमध्ये ठेवलेला भात जर तुम्ही खाल्लात तर आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.  ( हे पण वाचा-फिगर मेटेंन करण्यासाठी फक्त डाएट नाही, तर घरच्याघरी 'हा' व्यायाम केल्याने झटपट व्हाल बारीक)

Web Title: Know the disadvantages and benefits of eating cold rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य