शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

अल्कोहोलमुळे होणाऱ्या आजारांची ही आहेत ८ लक्षणे, वेळीच ओळखाल तर फायद्यात रहाल... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 10:52 AM

अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिजीज म्हणजेच एआरएलडी अनेक वर्ष मद्यसेवन केल्याने होतो. जेव्हा तुम्ही अनेक वर्ष मद्यसेवन करता तेव्हा याने स्टीटोसिस म्हणजेच फॅटी लिव्हर विकसित होतं.

(Image Credit : express.co.uk)

अत्याधिक मद्यसेवन केल्याने दुष्परिणामांपैकी एक म्हणजे लिव्हरसंबंधी आजार. अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिजीज म्हणजेच एआरएलडी अनेक वर्ष मद्यसेवन केल्याने होतो. जेव्हा तुम्ही अनेक वर्ष मद्यसेवन करता तेव्हा याने स्टीटोसिस म्हणजेच फॅटी लिव्हर विकसित होतं. साधारण ९० टक्के हेवी ड्रिंकर्समध्ये फॅटी लिव्हर आढळतो. तर २५ टक्के लोकांना अल्कोहोलिक हेपेटाटिस आणि १५ टक्के लोकांना सिसोसिस होतो. अनेक वर्ष मद्यसेवन करत राहिल्याने लिव्हरवर सूज येते, याला सिरोसिस म्हणूनही ओळखलं जातं. सिरोसिस हा लिव्हर रोगाचा अंतिम टप्पा असतो. चला जाणून घेऊ याबाबत...

सुरूवातीचे संकेत

(Image Credit : medicalnewstoday.com)

अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिजीज पूर्णपणे स्पष्ट नसतात, पण याने शरीराच्या वेगवेगळ्या प्रणाली प्रभावित होतात. हा आजार झाला तर व्यक्तीला सतत अस्वस्थ वाटतं. इतर लक्षणांमध्ये पोट दुखणे, मळमळ होणे, संडास लागणे आणि भूक कमी होणे या समस्या दिसू शकतात. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष करत मद्यसेवन सुरूच ठेवलं तर लिव्हरची समस्या आणखी वाढू शकते.

लक्षणे

जेव्हा अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिजीजची समस्या वाढू लागते, तेव्हा याची काही लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात.

(Image Credit : npr.org)

- कावीळ, डोळे किंवा त्वचेवर पिवळे डाग

- पोटात तरल पदार्थ तयार होणे

- त्वचेवर अधिक जास्त खाज येणे

- वजन कमी होणे

- कमजोरी आणि मासंपेशीमध्ये थकवा जाणवणे

- उलटी आणि मळमळ होणे

- विष्ठेतून रक्त येणे

उपाय 

या आजाराच्या उपचाराचं सर्वात पहिलं पाऊल म्हणजे मद्यसेवन पूर्णपणे बंद करावं. सोबतच आजार ठीक झाल्यावर पुन्हा मद्यसेवन करू नये. सुरूवातीला भलेही मद्यसेवन पूर्णपणे बंद करणं कठीण असेल, पण तुम्ही हळूहळू याचं प्रमाण कमी करू शकता. त्यानंतर पूर्णपणे बंद करा.

(Image Credit : thestatesman.com)

मद्यसेवनाची सवय सोडवण्यासाठी चिकित्सक मदत घेतली जाऊ शकते. यात वेगवेगळ्या थेरपींच्या माध्यमातून तुम्ही मद्यसेवन बंद करू शकता. तेच लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तुम्हाला उपचारात मदत मिळू शकते. धुम्रपान बंद करा. सोबतच वजन नियंत्रणात ठेवा. वजन आणि धुम्रपान अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिजीजल अधिक मजबूत करतं. तसेच नियमित मल्टीव्हिटॅमिनचं सेवन करणंही फायदेशीर ठरतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य