शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कमी वयातसुद्धा वजनामुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या, जाणून घ्या कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 10:13 IST

अनियमीत आहार आणि जंक फुडचं अतिसेवन यांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. लिव्हरशी निगडीत असलेले आजार होण्याची शक्यता असते.

धावपळीचं जीवन आणि बदलेली जीवनशैली यांमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. नकळतपणे लहान- मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने याचं रुपांतर मोठ्या आजारांमध्ये होतं. अनियमीत आहार आणि जंक फुडचं अतिसेवन यांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. लिव्हरशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते.  त्यात टाइप २ डायबिटीस, टाइप २ फॅटी लिव्हर होण्याचा धोका जास्त असतो. काहीवेळा लिव्हरमध्ये सूज येत असते. आज आम्ही तुम्हाला या आजारापासून बचावाचे उपाय सांगणार आहोत.

फॅटी लिव्हर म्हणजे काय

यकृत अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करते आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतं. पण एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण झाल्यास या समस्येस फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. डायबिटीस असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. 

फॅटी लिव्हरची कारणं

वजन कमी होणं

वजन वाढल्यानंतर कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. अनेकदा चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. अन्नाचं पचन करण्यासाठी लिव्हरचं कार्य सुरळीत असणं गरजेचं असतं. योग्य प्रमाणात आहार शरीराला मिळाला नाही तर पचनक्रियेवर परिणाम होतो. परिणामी फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते.

 तेलकट, खारट पदार्थ

तळलेल्या पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन होत असल्यास लिव्हरच्या समस्या वाढण्याची भीती जास्त असते. तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स असतात. मिठाचा वापर कमीत कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मिठामुळे उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तसंच मादक पदार्थांचे सेवन फॅटी लिव्हर असणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. 

फॅटी लिव्हरच्या समस्येवर उपाय

अक्रोड 

अक्रोडात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. महत्त्वाचे म्हणजे  यामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार,फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी आहारात कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

एपल व्हिनेगर

एपल व्हिनेगरमुळे  पचनक्रिया चांगली राहते. शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी एपल व्हिनेगर फायदेशीर असतं. त्यात अनेक एंटी-ऑक्सिडटंस असतात. त्यामुळे फॅटी लिव्हरच्या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो. ( हे पण वाचा-कोरोनापासून बचावासाठी फक्त ग्लोव्हज मास्क नाही तर आहारातील 'हे' पदार्थ ठरतील इफेक्टीव्ह)

कॉफी

कॉफीमध्ये असलेल्या  तत्त्वांमुळे मधुमेह आणि वजन वाढण्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते. फॅटी लिव्हरचा त्रासदेखील कॉफी बऱ्याच प्रमाणात कमी करते. तरीही कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे आवश्यक आहे.  ( हे पण वाचा-CoronaVirus : डोळ्यांच्या वेदना ठरू शकतात कोरोनाच्या इन्फेक्शचं मोठं कारण, जाणून घ्या रिसर्च)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य