नुसतं वॉकिंग नाही, तर 'वॉकिंग मेडिटेशन' केल्याने गंभीर आजारांपासून होईल सुटका...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 10:14 AM2020-04-08T10:14:30+5:302020-04-08T10:35:12+5:30

पोट फुगल्यासारखं वाटत असेल, किंवा शरीर जड वाटत असेल तर वॉकिंग मेडिटेशन केल्याने पचनक्रिया सुधारते.

Know the benefits of walking meditation myb | नुसतं वॉकिंग नाही, तर 'वॉकिंग मेडिटेशन' केल्याने गंभीर आजारांपासून होईल सुटका...

नुसतं वॉकिंग नाही, तर 'वॉकिंग मेडिटेशन' केल्याने गंभीर आजारांपासून होईल सुटका...

Next

व्यायमाचे फायदे तुम्हाला माहीतच असतील. व्यायामामुळे शरीर लवचीक राहतं. रोगप्रतिकराकशक्ती वाढते. आज आम्ही तुम्हाला व्यायामाइतकंच प्रभावी असलेल्या एका चालण्याच्या प्रकाराबद्दल सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील. वॉकिंग मेडिटेशन हा प्रकार शरीर आणि मन या दोन्हीसाठी  फायदेशीर ठरतो. यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसनच्यामते आतड्यांमध्ये असलेली सूज, अस्थमा, अशा आजारांपासून लांब राहण्यासाठी वॉकिंग मेडिटेशन महत्वाचं आहे.


वॉकिंग मेडिटेशन काय आहे

वॉकिंग मेडिटेशन करत असलेल्या व्यक्तीला एका विशाल गोलाकार भागावर सरळ रेषेत चालायचं असतं. त्यामुळे शरीर आणि मेंदू एका जागी केंद्रित होत असतो. हळू हळू पुढे चालावं लागतं. हा प्रकार करत असताना डोक्यात अनेक विचार येत असतात. पण काहीवेळानंतर मन शांत होत असतं. वॉकिंग  मेडिटेशनचे अनेक फायदे आहेत.

ब्लड सर्क्युलेशन 

जास्त वेळ बसून काम करत असलेल्या लोकांनी पाय हलके करण्यासाठी वॉकिंग मेडिटेशन करायला हवं. त्यामुळे उर्जा निर्माण होऊन शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. संपूर्ण शरीरात व्यवस्थित रक्तप्रवाह होतो. 

पचनक्रिया सुधारते

जेवल्यानंतर अन्न पचवण्यासाठी ही या प्रकाराची मदत होते. जर तुम्हाला जेवल्यानंतर  पोट फुगल्यासारखं वाटत असेल, किंवा शरीर जड वाटत असेल तर वॉकिंग मेडिटेशन केल्याने पचनक्रिया सुधारते. पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल तर हळूहळू कमी होऊन अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

स्ट्रेस कमी होतो

रोजच्या जीवनात अनेक ताण-तणाव येत असतात. अनेकदा मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. २०१७ अध्ययनात दिसून आलं की मनात येणारे वेगवेगळे विचार कमी होऊन मन शांत ठेवण्यासाठी वॉकिंग मेडिटेशन मदत करतं. झोप येत नसेल तर  ही समस्या सुद्धा दूर होते. या व्यायाम प्रकारामुळे तणावग्रस्त असलेलं मन शांत राहण्यास मदत होते. 

Web Title: Know the benefits of walking meditation myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.