घरात पाळीव प्राणी असतील तर वेळीच व्हा सावध, वाचाल तर वाचाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 10:09 AM2019-12-20T10:09:47+5:302019-12-20T10:21:28+5:30

अनेक लोकांना पाळीव प्राणी पाळण्याची खूप आवड असते. तसंच काही व्यक्ती मनोरंजन म्हणून तर काही लोक आपला ताण-तणाव हलका करण्यासाठी प्राणी पाळत असतात.

Know the Antibiotic resistant infection because of pets | घरात पाळीव प्राणी असतील तर वेळीच व्हा सावध, वाचाल तर वाचाल...

घरात पाळीव प्राणी असतील तर वेळीच व्हा सावध, वाचाल तर वाचाल...

Next

(image credit- the new york times)

अनेक लोकांना पाळीव प्राणी पाळण्याची खूप आवड असते. तसंच काही व्यक्ती मनोरंजन म्हणून तर काही लोक आपला ताण-तणाव हलका करण्यासाठी प्राणी पाळत असतात. पण पाळीव प्राणी पाळल्यामुळे मोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या पाळीव प्राणी पाळल्यानंतर असे काय होते. ज्यामुळे तुमचा जीव सुध्दा धोक्यात येऊ शकतो. 

कुत्रा, मांजर यांसारखे पाळीव प्राणी पाळल्यामुळे आयुष्यात जर तणावाचे वातावरण असेल तर ते कमी होण्यास मदत होते. तसंच  पाळीव प्राण्यांसोबत तुम्ही १० मिनिटं जरी घालवली तरी ताण- तणाव हलका होतो. 

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार  डिजीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिवेंशन (CDC) कडून  आलेल्या माहीतीनुसार एक धक्कादायक बाब समोर आली आहे. घरात जर तुम्ही पाळीव प्राणी पाळत असाल तर  इन्फेक्शनचा धोका असू शकतो. असं इन्फेक्शन जे अ‍ॅन्टीबायोटीक घेतल्यानंतर सुध्दा बरं होणारं नसतं. सीडीसीच्या रिपोर्टनुसार ३० लोकांचे निरीक्षण करण्यात आले. त्यात बॅक्टीरीयल इन्फेक्शन झालेले अधिक होते. त्यात असे निदर्शास आले की इन्फेक्शन झालेल्या लोकांमध्ये पाळीव प्राणी पाळणाऱ्या लोकांची संख्या अधिक होती. त्यांनी घरात  पाळलेले प्राणी हे प्राण्यांच्या शॉपमधून आणले होते.

(image credit0 the conversation.com)

या लोकांमध्ये वेगवेगळ्या राज्यांची लोकं होती. प्राण्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना हे इन्फेक्शन झाले. त्या लोकांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. या रेअर इन्फेक्शनला कॅम्पाइलोबॅक्टर जेजुनी असे नाव  आहे. तसंच ह्या प्रकारचं इन्फेक्शन कच्च किंवा अर्धवट शिजलेले चिकन खाल्ल्याने सुध्दा होतात. हे इन्फेक्शन झाल्यास अ‍ॅन्टीबायोटीक  गोळ्यांचं सेवन करून सुध्दा फरक पडत नाही.

(image credit- the independent)

दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांमुळे होत असलेल्या आजारांचं प्रमाण वाढत चालले आहे. हे इन्फेक्शन बॅक्टेरीया हवेत पसल्यामुळे होतं. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कुत्र्यांना सर्वाधिक प्रमाणात कॅम्पाइलोबॅक्टर इन्फेक्शनचा सामना करावा  लागतो. ह्या आजाराची लागण श्वासावाटे होते. त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होऊन आजार पसरण्याचा धोका असतो.

Web Title: Know the Antibiotic resistant infection because of pets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.