शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

'या' 7 संकेतांवरून ओळखा किडनीमध्ये आहे समस्या, वेळीच व्हाल सावध तर वाचेल जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:56 IST

Kidney Problem : किडनीमध्ये काही समस्या असेल तर शरीर काही संकेत देतं. ज्याकडे वेळीच लक्ष दिलं तर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो.

Kidney Problem : किडनी आपल्या शरीरातील रक्त दिवसभरातून जवळपास 40 वेळा गाळण्याचं काम करते. त्यानंतर विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढते. त्याशिवाय शरीरातील खनिजाचं संतुलन रेग्यूलेट करण्याचं आणि लाल रक्त पेशींची निर्मिती वाढवणाऱ्या हार्मोन्सना तयार करण्याचं काम किडनी करते. तशी तर किडनी शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. पण काही कारणांमुळे किडनीही फेल होऊ शकते.

किडनीमध्ये काही समस्या असेल तर शरीर काही संकेत देतं. ज्याकडे वेळीच लक्ष दिलं तर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. किडनीच्या आजारांना चार स्थितींमध्ये विभागण्यात आलं आहे. यात किडनी स्टोन, एक्यूट किडनी इंजरी, क्रॉनिक किडनी डिजीज आणि स्टेज रेनल डिजीज यांचा समावेश आहे. अनेकदा या समस्या जीवघेण्याही ठरू शकतात. अशात या संकेतांना ओळखणं गरजेचं असतं.

दिवसभर थकवा जाणवणे

एनएचएसनुसार, जर तुम्हाला अलिकडे जास्त थकवा जाणवत असेल तर याचं कारण तुमची किडनी योग्यप्रकारे काम करत नसल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्या कारणाने होऊ शकतं. विषारी पदार्थ आपल्या शरीरातील इतर जैविक क्रिया प्रभावित करण्याचं काम करतात आणि इतरही अनेक समस्या निर्माण करते.

पुरेशी झोप न घेणं

शरीराला आवश्यक तेवढी झोप घेतली नाही तर अनेक समस्या होतात. तेच किडनीची समस्या हेही याचं एक कारण असू शकतं. स्लीप एपनिया किंवा चांगली झोप येत नसेल तर किडनीमध्ये समस्या आहे असं समजा. अशात जर तुम्हाला सतत चांगली झोप येत नसेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा.

खाज असलेली त्वचा

कोरडी आणि खाज असलेली त्वचा विनाकारण बराच काळ राहिली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. तसेच किडनीसंबंधी टेस्ट करून घ्या. विषारी पदार्थ शरीरात जमा झाल्याने खनिज आणि इतर पोषक तत्वांचं प्रमाण बिघडतं. ज्यामुळे नंतर त्वचा आणि हाडांचं नुकसान होतं.

पायांवर सूज

किडनीमध्ये समस्या असेल तर शरीरातील विषारी पदार्थ पूर्णपणे बाहेर निघत नाहीत. ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. याचप्रमाणे जेव्हा शरीरातून सोडिअमचं अतिरिक्त प्रमाण बाहेर निघत नाही, तेव्हा पायांवर, टाचांवर आणि तळपायांवर सूज येतो. पायांवर सूज येण्याची इतरही आणखी काही कारणे आहेत. पण सल्ला हाच दिला जातो की, पायांवर सूज येत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

सूजलेले डोळे

जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला सूज आलेली दिसत असेल तर लगेच किडनीची टेस्ट करा. ही समस्या सामान्यपणे किडनीतील समस्येमुळे होते. कारण किडनी खराब झाल्यावर प्रोटीन लघवीद्वारे बाहेर निघून जातं.

मांसपेशींमध्ये वेदना

शरीरात जमा असलेल्या विषारी पदार्थांमुळे आणि खनिजांच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मांसपेशींमध्ये वेदना होऊ शकतात. कारण शरीरातील विषारी पदार्थ पूर्णपणे बाहेर पडत नाहीत. अशात मांसपेशींमधील वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. याने शरीरात अनेक वेगवेगळ्या समस्या वाढू शकतात.

जास्त वेळा लघवी लागणे

अनेकदा लघवीला जास्त जावं लागण्याला किडनीसंबंधी समस्येशी जोडलं जातं. जर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जास्त वेळा लघवीला जावं लागत असेल तर उशीर न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

किडनी हेल्दी ठेवण्याचे उपाय

किडनीची समस्या लगेच जाणून घेण्यासाठी नियमितपणे आरोग्याची टेस्ट करा. किडनीच्या समस्येमुळे तुम्हाला एखादा क्रॉनिक आजार होऊ शकतो. त्याशिवाय तुम्ही तुमच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करू शकता. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा, धुम्रपान बंद करा, मद्यसेवन नियंत्रित करा, नियमितपणे व्यायाम करा आणि पेनकिलरचं सेवन कमी करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य