किडनी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम किडनी करते. आपल्या शरीरात दोन किडन्या आहेत. तसं पाहायला गेलं तर व्यक्ती एकाच किडनीवर जीवंत राहू शकतो पण त्याची काम करण्याची क्षमता आधीएवढी राहत नाही. मुख्यतः किडनीचं काम रक्त स्वच्छ करणं, हार्मोन्स वाढवणं, मिनरल्स शोषून घेणं आणि अॅसिड कंट्रोल करणं ही आहेत. 

सध्या अनियमित आहार आणि काही सवयींमुळे किडनीवर परिणाम होताना दिसत आहेत. आद आम्ही तुम्हाला अशाच काही कामांबाबात सांगणार आहोत. ज्यांमुळे किडनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. 

1. पेनकिलरचा जास्त वापर करणं 

सतत घेण्यात येणारी औषधं म्हणजेच, 'नॉनस्टेरॉइड अॅन्टी-इफ्लेमेटरी ड्रग्स' तुमचं दुखणं कमी करू शकतात. पण याचा किडनीवर परिणाम होत असतो. त्यामुळे औषधांचं सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

2. जास्त वेळ लघवी रोखून धरणं 

तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल कामाच्या ताणामुळे किंवा अन्य कारणांमुळे बराच वेळ लघवी रोखून ठेवतात. जर तुम्हीही असचं काही करत असाल तर वेळीच सावध व्हा. लोकमत न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एक्सपर्ट्सच्या मते, लघवी रोखून धरल्याने किडनीवर परिणाम होत असतो. असं केल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात आणि यामुळे यूटीआयसारखे आजार होण्याचा धोका संभवतो. 

3. प्रोसेस्ड फूड 

प्रोसेस्ड फूड सोडियम आणि फॉस्फरसचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत. अनेक लोकं ज्यांना आतड्याचे आजार असतात. त्यांनी आहारातील फॉस्फरस कमी करणं आवश्यक असतं. काही संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, फॉस्फरसयुक्त प्रोसेस्ड पदार्थांचं अधिक सेवन आतडी आणि हाडांसाठी अत्यंत घातक ठरतं. 

4. जास्त मिठाचं सेवन 

मीठामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि आतड्यांना नुकसान पोहोचचं. मीठाऐवजी आयुर्वेदिक पदार्थ आणि मसाल्यांचा वापर करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. वेळेसोबतच तुम्हाला अतिरिक्त मीठ खाणं टाळणं गरेजंचं आहे. 

5. पाणी कमी पिणं 

शरीर हायड्रेट असेल तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं सहज शक्य होतं. तसेच किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणं उत्तम उपाय आहे. तुम्हाला दररोज 1ते 2 लीटर पाणी पिणं गरजेचं असतं. 

6. झोप पूर्ण न होणं 

रात्री शांपणे झोपणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 24 तासांची झोप घेणं आवश्यक असतं. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Kidney damage and kidney disease causes sign and symptoms habits that can cause kidney damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.