कापूर फक्त पुजेसाठीच वापरला जात नाही, फायदे इतके की वाचून व्हाल अवाक्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 22:35 IST2021-06-10T22:32:15+5:302021-06-10T22:35:24+5:30
आज आम्ही तुम्हाला कापूराचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्हाला माहितही नसतील पण तुमच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतील

कापूर फक्त पुजेसाठीच वापरला जात नाही, फायदे इतके की वाचून व्हाल अवाक्
दोन पद्धतीचे कापूर तुम्हाला माहिती असतील. यामध्ये एक जो पूजेसाठी वापरण्यात येतो आणि दुसरा म्हणजे जो कपड्यांमध्ये ठेवला जातो. पुजेसाठी वापरला जाणारा कापूर घर सुगंधी ठेवतो. बरेचजण पुजेच्या वेळी कापूराची धुप घालतात त्यामुळे वातावरण ताजेतवाने राहते. अशा या कापूराचे फायदे फार कमी लोकांना माहिती असतील मात्र औषधांच्या निर्मितीमध्ये कापूराचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला कापूराचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्हाला माहितही नसतील पण तुमच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतील
डोकेदुखी झाल्यास कापूर, सुंठ, अर्जुनची साल आणि पांढरं चंदन समान प्रमाणात बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट डोकेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरते.
कापूर डोळ्यांच्या समस्येसाठी फायदेशीर ठरतं. दुधात कापूर मिसळून डोळ्यांमध्ये काजळाप्रमाणे लावल्यास फार फरक पडतो.
अनेकदा विविध कारणांमुळे चेहऱ्यावर पुरळ उठते. यावर कापूराचं तेल फायदेशीर ठरतं. तसेच चेहऱ्यावरील पुरळाचे डाग तसेच राहतात. अशावेळी नारळाच्या तेलात कापूर मिसळून या डागांवर लावावं. यामुळे डाग निघून जातात तसंच कोरड्या त्वचेमध्ये ओलावा निर्माण होतो.
कापूरमध्ये अँन्टीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत होते.
प्रदूषण आणि इतर कारणांमुळे आजकाल लोकांना केस गळतीच्या तसंच आणि केसात कोंडा होण्याच्या तक्रारीला सामोरं जावं लागतंय. यावेळी नारळाच्या तेलात मिसळलेला कापूर केसांमध्ये लावल्याने डोक्यातील कोंडा आणि केसगळती या समस्या उद्भवत नाहीत.