शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जंक फूडचा नाद नडला! भारतात स्तन कर्करोगाचा धोका ४७८ टक्क्यांनी वाढला, रुग्णांत पाच पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 05:45 IST

भारतात बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : भारतात बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’मध्ये प्रसिद्ध ताज्या विश्लेषणानुसार, गेल्या तीन दशकांत भारतात स्तन कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ५ पटींनी वाढ झाली आहे. पारंपरिक भारतीय आहार म्हणजेच ‘भाजी-पोळी’ सोडून पाश्चिमात्य ‘जंक फूड’ संस्कृती स्वीकारल्याने हा धोका ४७७.८ टक्क्यांनी वाढल्याचे वास्तव समोर आले.

२.०३ लाख नवे रुग्ण  

अहवालानुसार, १९९० च्या तुलनेत २०२३ पर्यंत भारतात स्तन कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भारतात सध्या सुमारे २.०३ लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असून, या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या १.०२ लाखांपर्यंत पोहोचली आहे.  

कर्करोगाची प्रकरणे वाढण्यामागची कारणे?

खराब जीवनशैली : अनियमित दिनचर्या आणि आहारातील बदल.शारीरिक निष्क्रियता : व्यायामाचा अभाव आणि तासनतास एका जागी बसून काम करणे.व्यसन : अमली पदार्थ सेवन आणि धूम्रपान.उशिरा मातृत्व : उशिरा लग्न आणि उशिरा होणारी मुले.प्रक्रिया केलेले पदार्थ : जंक फूड, प्रोसेस्ड फूड आणि रेड मीटचे अतिसेवन.लठ्ठपणा : वाढते वजन आणि चरबी. 

प्रतिबंध आणि खबरदारी

अहवालात दिलासादायक बाब ही आहे की, जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास कर्करोगाचा धोका २८ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. 

वेळोवेळी मॅमोग्राफी आणि स्वतःहून तपासणी केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच आजार लक्षात येतो. त्यामुळे वेळीच उपचार मिळतात. 

जंक फूड टाळून पोषक आणि नैसर्गिक आहारावर भर द्यावा. दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करावा. यामुळे मोठ्या प्रमाणात धोका कमी करता येतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Junk food link: Breast cancer cases surge in India.

Web Summary : Breast cancer cases in India have surged fivefold in three decades, with a 478% increase linked to Western junk food diets. Poor lifestyle, lack of exercise, and processed foods are major contributing factors. Early detection and lifestyle changes can reduce the risk.
टॅग्स :Breast Cancerस्तनाचा कर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्स