जपानी वैज्ञानिकांनी तयार केली आर्टिफिशिअल शेपटी, उपयोग वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:59 AM2019-08-08T09:59:31+5:302019-08-08T10:04:31+5:30

जपानच्या किओ यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी एक अनोखी रोबोटिक शेपटी तयार केली आहे. आता या शेपटीचा मनुष्याला काय उपयोग? असा प्रश्न पडला असेलच.

Japanese researchers designed robotic tail that straps body to improve balance and agility | जपानी वैज्ञानिकांनी तयार केली आर्टिफिशिअल शेपटी, उपयोग वाचून व्हाल अवाक्

जपानी वैज्ञानिकांनी तयार केली आर्टिफिशिअल शेपटी, उपयोग वाचून व्हाल अवाक्

Next

जपानच्या किओ यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी एक अनोखी रोबोटिक शेपटी तयार केली आहे. आता या शेपटीचा मनुष्याला काय उपयोग? असा प्रश्न पडला असेलच. तर ही शेपटी मनुष्याला पडण्यापासून वाचवू शकते. वैज्ञानिकांनुसार, हा डिवाइस कंबरपट्ट्यासारखा तयार करण्यात आला आहे. कंबरेवर बांधून या शेपटीचा वापर केला जाऊ शकतो. पडण्याच्या स्थितीत हे शेपूट उलट्या दिशेने बॅलन्स होतं आणि तुम्ही पडण्यापासून वाचाल. या शेपटीचं नाव आर्क्यू ठेवण्यात आलं आहे.

गेमिंगमध्येही होईल वापर

वैज्ञानिकांनुसार, या शेपटीचं डिझाइन समुद्री घोड्यावरून प्रेरित आहे. हा एक पाण्यातील जंतू असून शेपटीच्या माध्यमातून शिकार आणि अटॅक करतो. तसेच अनेक गोष्टी एकत्र पकडण्याचीही यात क्षमता असते. ही शेपटी फार लवचिक असते. रोबोटिक शेपटीही तशीच तयार करण्यात आली आहे. ही शेपटी वापरणाऱ्या व्यक्तीच्या उंचीनुसार लहान-मोठी करता येते. 

(Image Credit : interestingengineering.com)

तसेच वैज्ञानिकांनी सांगितले की, शेपटी छोट्या छोट्या तुकड्यांपासून तयार करण्यात आली आहे. हे तुकडे वजनी आहेत. जे व्यक्तीला जड काहीतरी उचलून चालण्यादरम्यान बॅलन्स ठेवण्यास मदत करतात. तसेच रोबोटिक शेपटीमध्ये लावण्यात आलेल्या हार्डवेअरचा वापर गेमिंग आणि व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीमध्येही केला जाऊ शकतो. वैज्ञानिकांनी सध्या याचा एक प्रोटोटाइप तयार केला आहे. ही शेपटी लॉस एंजेलिसच्या वार्षिक अधिवेशनात सादर करण्यात आली होती.

आर्क्यूमध्ये अनेकप्रकारच्या रोबोटिक मांसपेशी लावण्यात आल्या आहेत. मांसपेशींची लांबी आणि यात तयार होणाऱ्या हवेच्य दाबामुळे त्या संचलित होतात. तसेच हे शेपटी शरीराच्या हालचालीच्या आधारावर हालचाल करते. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, आर्क्यूचा वापर एका सांगाड्यात रोबोट म्हणून केला जाऊ शकतो. यात मनुष्यांसारखी क्षमता असेल.

Web Title: Japanese researchers designed robotic tail that straps body to improve balance and agility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.