शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोरोनाच्या संकटात आता जपानमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार; १० लाख कोंबड्यांना मारलं जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 1:45 PM

Health Tips in Marathi : सध्याच्या काळात आशिया आणि युरोपमध्ये दोन वेगवेगळे एच 5 एन 8 एचपीएआय व्हायरस उपस्थित आहेत जे माहामारी पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. आता कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडल्यानंतर लोकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत जपानमध्ये मात्र एका नवीन आजारानं मान वर काढली आहे. हा आजार प्राण्यांमधून पसरणारा बर्ड फ्लू आहे. बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता जपानमधील चीबा प्रांतामध्ये ११ लाख कोंबड्यांना मारलं जाणार आहे. चीबा हा जपानमधील १३ वा असा प्रदेश आहे जिथे एच फाइव्ह हा बर्ड फ्लू वेगाने पसरला आहे.

बर्ड फ्लूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जपानने ११ लाख ६० हजार कोंबड्यांना संपवण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील अधिकाऱ्यांनी चीबामधील १० किमीपर्यंतचा परिसर क्वारंटाइन केला असून या ठिकाणी कोंबड्या आणि अंडी न पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीबासह कगवा, फुकुओका, हयोगो, मियाजाकी, हिरोशिमा, नारा, ओइता, वकायमा, शिगा, तोकुशिमा आणि कोचि या प्रांतांमध्येही बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जपानमध्ये ३४ लाख कोंबड्यांना मारून टाकण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी जपानच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ११ हजार पक्ष्यांना मारून त्यांना दफन  केलं आहे. हा निर्णय दक्षिण पश्चिम जपानच्या शिगा प्रातांतील हिगाशीओमी शहरातील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये अंड्यामुळे एवियन इन्फुंएंजा पसरल्यानंतर घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कागवा प्रांतातही बर्ड फ्लू चा प्रकोप पाहायला मिळत आहे. या आजाराच्या प्रसाराची सुरूवात मागच्या महिन्यात झाली होती.

कोरोनामुक्त रुग्णांना जीवघेण्या 'गुलियन बेरी सिंड्रोम'चा धोका; जाणून घ्या लक्षणं

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्यामते (एफएओ) जपान आणि शेजारी दक्षिण कोरियामध्ये पसरलेली माहामारी जगभरातील  कोंबड्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या दोन वेगवेगळ्या उच्च रोगजनक एवियन इन्फ्लूएंजा (एचपीएआई) यापैकी एक आहे. त्याचा जन्म सगळ्यात पहिल्यांदा युरोपमधील जंगली पक्ष्यांमध्ये झाला होता.

कोरोनापेक्षा भयंकर विषाणूंच्या भविष्यात साथी, इबोला शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचा इशारा

एफएओचे एक वरिष्ठ पशु आरोग्य अधिकारी मधूर ढींगरा यांनी सांगितले की, ''जपानमध्ये दिसून येणारा व्हायरस अनुवांशिंक रूपातून कोरियाई व्हायरस आणि युरोपमधील व्हायरसशी संबंधीत आहे. याचाच अर्थ असा की,  सध्याच्या काळात आशिया आणि युरोपमध्ये दोन वेगवेगळे एच 5 एन 8 एचपीएआय व्हायरस उपस्थित आहेत जे माहामारी पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. ''

एफएओने अफ्रिकी आरोग्य अधिकाऱ्यांना नुकतंच फ्लू व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी  सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. जपानमधील ४७ प्रातांमध्ये १० पेक्षा जास्त राज्यांत या माहामारीने कहर केला आहे. जवळपास ३ लाख पक्षी या आजाराने प्रभावीत आहेत. 

टॅग्स :JapanजपानHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय