शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

साखर कि गुळ? वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही उत्तम काय? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 16:57 IST

गुळाचे काही फायदे आहेत जे लक्षात ठेवणे महत्त्वाचेच आहे. परंतु ते जास्त प्रमाणात वापरणे किंवा त्याच्या पोषक तत्त्वांबद्दल माहिती न घेणे हे देखील हानिकारक असू शकते.

तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर बहुतेक लोक तुम्हाला तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे वजन वाढते. बरेच लोक साखरेऐवजी गुळाचे सेवन करतात. अशा स्थितीत साखरेच्या जागी गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.

गुळाचा वापर विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. पण आता लोक साखरेऐवजी गूळ पावडर वापरत आहेत. गुळामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे बी -१, बी -६ आणि सी असतात. यात फिनोलिक कंपाऊंड आहे. जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस काढून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. या कारणांमुळे, नियमित गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

गूळ साखरेपेक्षा जास्त पौष्टिक ?साखरेच्या तुलनेत गुळाचे अनेक फायदे आहेत. गुळात जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स तसेच भरपूर फायबर असते, जे पचनशक्ती सुधारण्यास मदत करते आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. अनेक आयुर्वेदिक तज्ज्ञ सकाळी गूळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण, यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय, गुळाची चव साखरेपेक्षा चांगली असते, जे चवीला साखरेपेक्षा कमी गोड असते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का?गुळाचे काही फायदे आहेत जे लक्षात ठेवणे महत्त्वाचेच आहे. परंतु ते जास्त प्रमाणात वापरणे किंवा त्याच्या पोषक तत्त्वांबद्दल माहिती न घेणे हे देखील हानिकारक असू शकते. लक्षात ठेवण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे साखरेमध्ये जितक्या कॅलरीज असतात तितक्याच गुळामध्ये असतात. जर तुम्ही त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढेल.

मधुमेहाच्या रुग्णांनी साखरेऐवजी गूळ घेण्यापूर्वी काळजी घ्यावी. कारण त्यात सुक्रोज आहे. जे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करते. कोणत्याही प्रकारचे आजार टाळण्यासाठी नेहमी गुळाचे सेवन करा. गुळ साखरेपेक्षा चांगला आरोग्यदायी पर्याय आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही ते तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.

वजन कमी करण्यासाठी गूळ कसा वापरावाजर तुम्ही वजन कमी करण्यासाठी गूळ वापरत असाल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील इतर साहित्य देखील वापरू शकता. आपण गूळ आणि लिंबू वापरून डिटॉक्स ड्रिंक बनवू शकता जे आपल्या चयापचय प्रक्रियेत सुधारणा करण्यास मदत करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स