शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

'हा' गोड पदार्थ खाऊन घटवू शकता तुम्ही वजन, आश्चर्य वाटलं ना? मग जाणून घ्या कोणता ते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:29 IST

गूळ साखरेपेक्षा जास्त आरोग्यदायी (Health Benefits Of Jaggery) मानला जातो. आज आम्ही तुम्हाला या गुळाचे काही महत्वाचे फायदे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.

गूळ हा एक नॅच्युरल स्वीटनर आहे. जो तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारे वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साखरेचा पर्याय म्हणून गुळाचा सहज वापर करू शकता. गुळाच्या साहाय्याने अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. उसाच्या रसापासून तयार केला जाणारा हा गूळ वर्षभर बाजारात सहज उपलब्ध असतो. गूळ अनरिफाइन्ड असतो. ज्यामुळे त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणून गूळ साखरेपेक्षा जास्त आरोग्यदायी (Health Benefits Of Jaggery) मानला जातो. आज आम्ही तुम्हाला या गुळाचे काही महत्वाचे फायदे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.

सांधेदुखी कमी करतो गूळसध्याच्या धावत्या काळात कोणीच शांत राहू शकत नाही. माणसाला सतत काम करत राहावे लागते. मात्र यामुळे तब्येतीची हेळसांड होते. अशात सांधेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? गुळाच्या सेवनाने तुमच्या सांधेदुखीच्या तक्रारी कमी होऊ शकतात. आपण दररोज गुळाचे सेवन केले तर आपल्याला चांगले परिणाम मिळतील.

गुळामुळे सुधारते पचनक्रियागुळामध्ये भरपूर फायबर आढळते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. याच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने अन्न लवकर पचते. असे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झाले आहे. म्हणूनच गुळाचे सेवन नियमित करावे. याशिवाय रात्री झोपताना गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि सकाळी बद्धकोष्ठता किंवा अपचन सारखी समस्या होत नाही.

अ‍ॅनिमियासाठी उपयुक्तआपल्या शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाची समस्या उद्भवते. मात्र ही समस्या जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये दिसते. कारण मासिक पाळीच्या दरम्यान महिलांच्या शरीरातून रक्त बाहेर येण्यामुळे लाल रक्तपेशी कमी होतात. अशा परिस्थितीत गूळ खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. गुळामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. अशक्तपणाचा त्रास असलेल्या व्यक्तीने हरभरा गुळामध्ये मिसळून खावा. यामुळे लोहाचे प्रमाण वाढेल.

वजन कमी करण्यासाठी प्रभावीजर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गुळाच्या पाण्याचे सेवन करणे हे सर्वात प्रभावी औषध आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक आहारतज्ञ गुळाच्या पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे पाणी नियमितपणे प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स