शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे का आणि काय आहे उपाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 11:44 IST

जे लोक पोटावरील चरबीमुळे हैराण आहेत, ते वजन कमी करण्याचा विचार करतात. पण त्यांना हा प्रश्न पडतो की, काय केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे?

शरीरात फॅट म्हणजेच चरबी जमा होणं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळं असतं. प्रत्येकाचा लठ्ठपणा वेगवेगळा असतो. कुणाला पोटावरील चरबीचा लठ्ठपणा असतो तर कुणाच्या संपूर्ण शरीरात फॅट आणि लठ्ठपणा असतो. योग्य शरीरासाठी आणि आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात फॅट असणं गरजेचं आहे. पण फॅट जास्त असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोटावरील चरबीचा अनेकांना सर्वात जास्त त्रास होतो. अलिकडे ही समस्या अधिक बघायला मिळते.

द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, जे लोक पोटावरील चरबीमुळे हैराण आहेत, ते वजन कमी करण्याचा विचार करतात. पण त्यांना हा प्रश्न पडतो की, काय केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे? हा असा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. पण याबाबत काही रिसर्च करण्यात आलेत. जर तुम्हीही पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यापेक्षा केवळ पोटावरील कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हे शक्य आहे का? हे जाणून घेऊ.

केवळ पोटावरील चरबी कमी करता येते?

(Image Credit : Today I Found Out)

जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी एखादा एरिया सिलेक्ट करतो तेव्हा त्याला स्पॉट रिडक्शन असं म्हटलं जातं. अनेक रिसर्चमधून हे सांगण्यात आलं आहे की, कधी कधी स्पॉट रिडक्शन वेट लॉस प्लॅन यशस्वी होत नाही.

जर्नल ऑफ स्ट्रेंथ कंडीशनिंग रिसर्चमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, ६ आठवडे ऍब्स वर्कआउट सुद्धा व्यक्तीच्या पोटावरील चरबी कमी करू शकत नाही. एका दुसऱ्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, १२ आठवडे हाताचे वर्कआउट करूनही हातावरील चरबी कमी झाली नाही. तर हातावरील चरबी सैल होती ती टाइट झाली होती. या दोन्ही रिसर्चमधून हे समोर येतं की, अनेक केसेसमध्ये वर्कआउट किंवा एक्सरसाइज सुद्धा वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत नाही. खासकरून पोटावरील चरबी करण्याबाबत असं होतं.

(Image Credit : Livin3)

तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर आधी शरीराचा मेटाबॉलिक रेट योग्य करा. चांगल्या मेटाबॉलिक रेटसाठी नियमित एक्सरसाइज करणे सर्वात चांगलं मानलं जातं. एक्सपर्ट सांगतात की, बेली फॅट म्हणजेच पोटवरील चरबी कमी करण्यासाठी मेटाबॉलिक रेट योग्य ठेवणं गरजेचं असतं. 

नेमकं काय होतं?

(Image Credit : waterbell.eu)

मेटाबॉलिक रेटमुळे पोटावरील चरबी कमी कशी होते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एक्सरसाइज करते तेव्हा शरीरात एक हार्मोन रिलीज होतं. हा हार्मोन मेटाबॉलिक रेटचा वेग वाढवतो आणि याने शरीरात जमा चरबी कमी होऊ लागते. पोट, हात आणि छातीवरील चरबी मेटाबॉलिक रेट वाढल्याने कमी होऊ शकते. 

पोट आत घेण्यासाठी एक्सरसाइज

(Image Credit : beeindia.in)

अनेक रिसर्च सांगतात की, एरोबिक, रनिंग करणे, स्वीमिंग करणे, सायकलिंग या एक्सरसाइज संपूर्ण शरीर फिट ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगल्या एक्सरसाइज मानल्या जातात. त्यासोबतच या एक्सरसाइजच्या मदतीने पोटावरील चरबीही कमी करण्यास मदत मिळते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स