Walking Or Spot Jogging: बदलती लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीने वाढलेलं वजन कमी करण्यासाठी व हेल्दी राहण्यासाठी नियमितपणे एक्सरसाईज करणं गरजेचं झालं आहे. मात्र, आजकाल लोक कामात जास्त बिझी असल्याने किंवा फोन, टीव्ही, कम्प्युटरवर जास्त वेळ घालवत असल्याने फिजिकली अॅक्टिव कमी राहतात. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, केवळ १० मिनिटांची फिजिकल अॅक्टिविटी करूनही तुम्ही ४५ मिनिट पायी चालण्या इतके फायदे मिळवू शकता.
एक्सरसाईज करणं शरीरासाठी किती महत्वाचं आहे. हे माहीत असूनही बरेच लोक एक्सरसाईजसाठी वेळ काढू शकत नाहीत. जर तुम्हीही अशाच लोकांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक पर्याय आहे. एक्सरसाईजसाठी किंवा वॉकसाठी ४५ मिनिटांची गरज पडणार नाही. कारण १० मिनिटांच्या स्पॉट जॉगिंगने तुम्ही ४५ मिनिटांच्या वॉक इतका फायदा मिळवू शकता.
हाय इंन्टेसिटी वर्कआउट
४५ मिनिटांच्या वॉकच्या तुलनेत १० मिनिटांच्या स्पॉट जॉगिंगला यामुळे चांगलं मानलं जाऊ शकतं, कारण हा एक हाय इंन्टेसिटी वर्कआउट आहे. जो करून कमी वेळात फायदा मिळू शकतो. साधारण ४५ मिनिटे वॉक केल्यानंतर १५० ते २०० कॅलरी बर्न होतात. हे व्यक्तीचं वजन आणि त्याच्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून असतं. तेच १० मिनिटे स्पॉट जॉगिंग करून ८० ते १२० कॅलरी बर्न होतात.
कुठेही करणं शक्य
दिवसभर ऑफिसमध्ये किंवा साइटवर काम केल्यानंतर व्यक्तीला इतका थकवा येतो की, जिममध्ये जाण्याचा ते विचारही करत नाहीत. अशात स्पॉट जॉगिंग एक चांगलं पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. केवळ १० मिनिटे वेळ देऊन तुम्ही स्वत:ला फीट ठेवू शकता. तुम्ही घरात स्पॉट जॉगिंग करू शकता.
हृदयासाठी फायदेशीर
स्पॉट जॉगिंग तुमच्या एरोबिक फिटनेस लेव्हल आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. स्पीडने एकाच जागी जॉगिंग केल्याने हार्ट रेटही सुधारतो. तसेच ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहण्यास मदत मिळते. चालण्याच्या तुलनेत या एक्सरसाईजने हार्ट हेल्थ अधिक चांगली राहू शकते.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?
कमी वेळात जास्त फायदे मिळवण्यासाठी स्पॉट जॉगिंग फायदेशीर ठरू शकते. पण ही एक्सरसाईज हेल्थ कंडीशनचा विचार करूनच करावी. स्पॉट जॉगिंगदरम्यान तुमचे सांधे आणि मांसपेशींवर दबाव पडू शकतो. अशात तुमच्या जॉईंट्समध्ये वेदना राहतात किंवा अर्थरायटिसची समस्या असेल तर स्पॉट जॉगिंग तुमच्यासाठी नाही.