शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

International Yoga Day 2024: १ जानेवारी नाही? निदान २१ जून तरी; योगदिनावर पुनश्च करूया आरोग्यदायी सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 14:01 IST

International Yoga Day 2024: २१ जूनपासून जरी योगाभ्यास सुरू केलात, तरी डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत मिळेल तंदरुस्त शरीर!

नवीन वर्षाचा पहिला संकल्प असतो आरोग्य सुधारण्याचा; पण जून संपत आला तरी संकल्पपूर्ती नाही? योगदिनावर करा नवी सुरुवात! एखादी चांगली गोष्ट घडण्यात विलंब होऊ लागला की आपल्या घरातली मोठी माणसं लगेच म्हणतात, कधी योग येणारे काय माहीत! योग असा जुळून येतो की जुळवूनही आणता येतो? चला पाहूया... 

आपल्याकडे महागडा फोन असो नाहीतर कामचलाऊ, पण त्यात नेटवर्क नसेल, तर तो केवळ डब्बा आहे, बिनकामाचा! तसाच आपला देह निश्चल असेल, निष्प्राण असेल, अचेतन असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. त्या देहाला गरज आहे चैतन्याची. ते चैतन्य मिळते योगसाधनेतून! जोवर आपला स्वतःशी परिचय होत नाही, तोवर आपण जगाशी सख्य जोडूनही एकटेच राहतो. म्हणून स्वतःशी मैत्री करायची असेल, तर योगसाधनेला पर्याय नाही. म्हणून केवळ आजच्या दिवसापुरती योग साधना न करता आजपासून योग साधनेला प्रारंभ करा आणि ती दैनंदिन आयुष्यातील एक सवय बनवून घ्या. जेवण, झोप यांच्याइतकेच योगाभ्यासाचा महत्त्व द्या. शरीर उत्तम असेल, तर मन एकाग्र होईल आणि मन एकाग्र असेल तरच आंतरिक शक्तीची ओळख पटेल. 

लहान मुलांना आपण ओरडतो. एका जागेवर शांत बस. वास्तविक पाहता, मुले देहाने फिरत असतात, पण त्यांचे मन आत्मानंदाची, सहजानंदाची अनुभूती घेत असते. त्यामुळे ते मनाने स्थिर व देहाने अस्थिर असतात. याउलट मोठी माणसं देहाने जेवढी शांत दिसतात, त्याउलट ती मनाने सैरभैर फिरत असतात. अशा मनाला नियंत्रित करण्याचे सामर्थ्य योग साधनेत आहे. म्हणून रोज योगाभ्यास केलाच पाहिजे. 

योगाभ्यासाने अनेक परिणाम साध्य होतात. वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.

१) सर्व स्तरांवर तंदुरुस्ती २) वजनात घट ३) ताण-तणावापासून मुक्ती ४) आंतरिक शांतता ५) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ ६) सजगतेत वाढ ७) नाते संबंधात सुधारणा. ८) उर्जा शक्तीत वाढ. ९) शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते. १०) संयम वाढतो. 

हे सर्व फायदे लक्षात घेतल्यावर तुम्हालाच तुमचे उत्तर सापडले असेल. आपली ग्रहदशा बिघडली की वरील १० मुद्दे नशिबात असूनही खोडले जातात. याउलट योगाभ्यासाने हे दहा लाभ होत असतील तर कुंडलीत नसलेले योग जुळून यायला कितीसा अवधी लागणार आहे? यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनापासून योगाभ्यासाची आवड आणि सवय लावून घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा!

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगासने प्रकार व फायदेHealth Tipsहेल्थ टिप्स