शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

योग करताना 'या' नियमाचं पालन करणं गरजेचं, दुर्लक्ष कराल होईल नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 11:26 IST

International Yoga Day 2024: योगाभ्यास करायचा असेल तर काही नियम पाळावे लागतात. तसेच योगाभ्यास करताना श्वास घेणे आणि सोडणे ही गोष्टही महत्वाची आहे.

International Yoga Day 2024: २१ जून रोजी इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जातो. सध्याच्या लाइफस्टाईलमध्ये योगाभ्यास करणं एक गरजही आहे. पण योगाभ्यास करायचा असेल तर काही नियम पाळावे लागतात. त्यामुळे योगाभ्यास करण्याआधी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. 

कधी करावा?

एक्सपर्टनुसार, योगाभ्यास करण्याची योग्य वेळ ही पहाटे ४ ते ७ वाजता असते. जर सकाळी योगाभ्यास करणं शक्य नसेल तर सायंकाळीही सराव करु शकता. योगासने कधीही करा पण जेवण केल्याच्या ४ तासांनंतर योगाभ्यास करावा.

कसे कपडे परिधान करावे?

योगाभ्यास करताना नेहमी सैल कपडे परिधान करावे. यामुळे योगासनांचा अभ्यास करताना कपड्यांमुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सूती कपडे असल्यास फारच उत्तम. 

किती योगाभ्यास करावा?

योगाभ्यासाची सुरुवात वॉर्मअपने करावी. प्रत्येक आसनं करताना मधल्या वेळेत काही मिनिटांची विश्रांती घ्यावी. स्वतःच्या क्षमतेनुसार आसनांची अंतिम स्थिती धारण करावी, व सरावानुसार आवर्तनं आणि अंतिम स्थिती टिकवण्याची वेळ वाढवावीत. योग प्रशिक्षकांसोबत चर्चा करुन आपल्या शारीरिक क्षमतेनुसार योगाभ्यासाचा वेळ ठरवू शकता. 

योग्य ताळमेळ

योगाभ्यास करताना आसनात ताळमेळ अनेकजण ठेवत नाहीत. आपल्या मनाने कधी कमी तर कधी जास्त वेळ आसन केलं जातं. इतकेच नाही तर काही लोक सतत काही दिवस योगाभ्यास करतात आणि काही दिवस करत नाहीत. असं केल्याने शरीरावर सकारात्मक प्रभावाऐवजी नकारात्मक प्रभाव पडू लागतो. त्यामुळे अंगदुखीसारखी समस्या होऊ होते.

आसनात जबरदस्ती

योगाभ्यास करताना कधीही शरीरासोबत जबरदस्ती करू नये, कारण असं करून तुम्ही तुमच्या शरीराच्या मसल्स आणि नसांवर उगाच ताण देत असता, जे फारच घातक ठरू शकतं. योगाभ्यास करताना जेवढं शक्य असेल तेवढच वाका किंवा हाता-पायांना ताणा.

श्वास घेण्याची पद्धत

योगाभ्यासात श्वास योग्यप्रकारे घेणे आणि त्यावर लक्ष केंद्रीत करणे फार महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तसं न केल्यास शरीराला कोणताही फायदा मिळत नाही. जसे की, आसन करताना समोर वाकतेवेळी श्वास बाहेर आणि मागे होता श्वास आत घेतला पाहिजे. सोबतच श्वासावर लक्ष केंद्रीत करण ही सुद्धा एक कला आहे. जर तुम्ही लागोपाठ श्वास घेणार नाही तर तुमच्या मांसपेशींपर्यंत ऑक्सिजन पोहचणार नाही. 

खाणं-पिणं आणि योगाभ्यासात अंतर

जेवण आणि योगाभ्यास यात कमीत कमी ३ तासांचं अंतर असणं फार गरजेचं आहे. तसेच अनेकदा योगाभ्यास करताना लोक मधेच पाणी पितात, असं अजिबात करू नये. कमीत कमी १ तासानंतरच पाणी प्यावे. योगाभ्यास करण्याच्या एक तास आधी पाणी बंद करा.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगासने प्रकार व फायदेHealth Tipsहेल्थ टिप्स