शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

International Yoga Day 2021 : किडनी आणि फुप्फुसासहीत अनेक आजारांचा उपचार आहे हा प्राणायाम, फायदे वाचून लगेच करायला बसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 12:20 IST

International Yoga Day 2021 : हे आसन सर्वात लोकप्रिय आसनांपैकी एक आहे. ज्याने श्वसनक्रियेत सुधारणा होते. याने केवळ मानसिक आरोग्यच चांगलं राहतं असं नाही तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं.

योग आपलं मन आणि शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. योगाचे वेगवेगळे प्रकार किंवा आसने आहेत. त्यातीलच एक आरोग्यासाठी फायदेशीर असं आसन म्हणजे कपालभाति प्राणायाम. हे आसन सर्वात लोकप्रिय आसनांपैकी एक आहे. ज्याने श्वसनक्रियेत सुधारणा होते. याने केवळ मानसिक आरोग्यच चांगलं राहतं असं नाही तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं.

कसं करतात कपालभाति आसन

कपालभाती प्राणायामात सामान्य स्थितीत बसुन सामान्य स्वरूपात श्वास घेतला जातो व श्वास सोडला जातो, श्वास सोडतांना आपल्या पोटाच्या आतडयांना संकुचित करावे लागते. ही क्रिया योगाभ्यासातील मध्यम क्रिया मानली जाते. आज ही क्रिया विश्वभरात सर्वत्र केली जाते, विविध योग शिबीरात किंवा जे योगाचे जाणते आहेत ते यास नक्कीच करतात. कपालभाती ही एक श्वास घेण्याची संतुलीत पध्दती आहे.  याच्या सरावामुळे शरीरातील सर्व नकारात्मक तत्व निघुन जातात.

कसं करावं हे आसन?

दोन्ही पायांना आराम मिळेल अशा स्थितीत बसावे.

एक लांब श्वास घेवून श्वास सोडावा, श्वास घेण्यावर महत्व न देता श्वास सोडण्यावर ध्यान केंद्रित करावे.

श्वास घेतांना पोटातील आतडी फुगली पाहिजे व श्वास सोडतांना आतडी संकुचीत झाली पाहीजे.

यास एकावेळी १० ते १५ वेळा नक्कीच करावे.

या काही गोष्टींची काळजी घ्यावी

या प्राणायामास एखाद्या विशेषज्ञाच्या देखरेखीखाली करावे. हळूहळू सरावाचा वेळ वाढवत न्यावा.उच्च रक्तदाबाच्या रोग्यांनी याचा सराव शक्यतो करू नये.यास शक्यतो सकाळीच करावे. रात्रीस करू नये.चक्कर येणे किंवा थकल्यासारखे वाटत असल्यास याचा सराव करू नये.

कपालभाती प्राणायाम करण्याचे लाभ

अनेक लोक यास शरीरास आराम देण्यासाठीही करतात.

काही लोक आपले वजन कमी करण्यासाठीही याचा अभ्यास करतात.

याच्या नियमीत सरावाने श्वसन तंत्र सुरळीत होते.

फुफ्फुसाचे संक्रमणही यामुळे कमी होते तसेच एलर्जीक तत्व शरीराबाहेर टाकले जातात.

याच्या सरावामुळे डायाफाम लवचीक बनते त्याची कार्यदक्षता ही वाढविली जाते.

शरीरातील खालच्या अंगांना रक्ताचा पुरवठा नियमीत केला जातो.

फफ्फुसाचे कार्य सुरळीत चालते तसेच त्यातील संक्रमणही दुर होते.

शरीरात जास्त प्रमाणात आॅक्सीजन पुरवला जातो त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढविली जाते.

या प्राणायामामुळे कूंडलिनी जागृत होतात तसेच मन एकाग्र होते. 

टॅग्स :YogaयोगInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनHealthआरोग्य