शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

लिव्हरच्या 'या' गंभीर आजाराचे रोज हजारो लोक होत आहेत शिकार, जाणून घ्या कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 12:23 IST

Hepatitis Cases In India: रिपोर्टमध्ये  सांगण्यात आल की, हेपेटायटिसमुळे रोज जगभरात तीन हजार लोकांचा मृत्यू होत आहे तर 6 हजारांपेक्षा जास्त लोक याचे शिकार होतात. 

Hepatitis Cases In India:  आजकाल जगभरात लिव्हरसंबंधी वेगवेगळे आजार लोकांमध्ये वाढत आहेत. लिव्हरच्या वेगवेगळ्या आजारांपैकी एक गंभीर आजार म्हणजे हेपेटायटिस. दरवर्षी भारतात हेपेटायटिस आजाराचे हजारो रूग्ण आढळतात. नुकताच 'वर्ल्ड हेपेटायटिस रिपोर्ट 2024' च्या प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये हेपेटायटिस आजार आणि त्यासंबंधी अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. या रिपोर्टमध्ये  सांगण्यात आल की, हेपेटायटिसमुळे रोज जगभरात तीन हजार लोकांचा मृत्यू होत आहे तर 6 हजारांपेक्षा जास्त लोक याचे शिकार होतात. 

काय आहे हा आजार?

हेपेटायटिस लिव्हरसंबंधी आजार आहे. जो मुख्यपणे वायरल इन्फेक्शनमुळे होतो. या आजारात लिव्हरवर सूज येऊ लागते. एक्सपर्ट्सनुसार, हेपेटायटिस हा आजार 5 प्रकारच्या वायरसच्या आधारावर ओळखली जाते. याना हेपेटायटिस ए, बी, सी, डी आणि ई म्हणून ओळखलं जातं. आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी हेपेटायटिसने जवळपास 13 लाख लोकांचा मृत्यू होतो.

3 वर्षात वाढले मृत्यू

रिपोर्टच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये वायरल हेपेटायटिसने 11 लाख लोकांचा जीव गेला होता. तेच 2022 मध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली. 2022 मध्ये 13 लाख लोकांचा जीव या आजारामुळे गेला. यातील जवळपास 83 टक्के मृत्यू हे हेपेटायटिस बी मुळे झालीत. तसेच 17 टक्के केसेसमध्ये रूग्ण हेपेटायटिस सी ने पीडित होते. 2022 मध्ये 25.4 कोटी लोक हेपेटायटिस बी आजाराने ग्रस्त आढळले.

या रिपोर्टमधून समोर आलं आहे की, कमी वयातही लोकांना हेपेटायटिस आजार होण्याचं प्रमाणही अधिक आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी आजाराने गंभीर रूपाने संक्रमित 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचं वय 30 ते 54 होतं. यात 12 टक्के रूग्ण लहान मुले होती. तर 58 टक्के रूग्ण वयस्क पुरूष होते.

भारतात सगळ्यात जास्त केसेस

हेपेटायटिसने सगळ्यात जास्त प्रभावित 10 देशांच्या यादीत भारताचं नावही बरंच वर आहे. या देशांमध्ये चीन, भारत, फिलीपींस, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, व्हिएतनाम आणि रशिया यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर हेपेटायटिस बी आणि सी चे सगळ्यात जास्त रूग्ण चीनमध्ये आढळतात. तर दुसऱ्या स्थानावर भारताचं नाव आहे. देशात 2022 मध्ये हेपेटायटिस बी आणि सी चे 3.53 कोटी केसेस आढळल्या. 

हेपेटायटिसची लक्षणे

- त्वचेवर पिवळेपणा

- डोळे पिवळे दिसणं

- नखांचा रंग पिवळा होणं

- सतत थकवा

- फ्लूसारखी लक्षण

- डार्क पिवळ्या रंगाची लघवी येणं

- डार्क पिवळ्या रंगाची विष्ठा येणं

- पोटदुखी

- भूक कमी लागणं

- अचानक वजन कमी होणं

कसा कराल बचाव?

हेपेटायटिस फारच घातक ठरू शकतो. त्यामुळे याचा धोका टाळणं फार गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर जीव गमवावा लागू शकतो. चला जाणून घेऊ बचावाचे उपाय....

1) वॅक्सीन घ्या

हेपेटायटिसपासून बचावासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपल्या मुलांना बालपणीच यासंबंधी वॅक्सीन लावा. असं केल्याने हेपेटायटिसचा धोका बराच कमी होतो. पण अजूनही हेपेटायटिस सी आणि ई साठी वॅक्सीन आलेली नाही.

2) व्हायरसपासून बचाव

हेपेटायटिसच्या व्हायरसचं संक्रमण तेव्हा पसरतं जेव्हा एका व्यक्तीच्या शरीरातील फ्यूइड दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात कसंतरी जातं. अशात ज्यांना हा आजार आहे त्यांच्यापासून अंतर ठेवा. यात रेजर, निडल, ब्रश, ब्लडपासून बचाव करणं या गोष्टींचा समावेश आहे. 

3) दुषित पाणी आणि अन्न

नेहमी घरातील स्वच्छ पाण्याचं आणि अन्नाचं सेवन करा. बाहेरचे पदार्थ जास्त खाल तर तुम्ही हेपेटायटिसचे शिकार होऊ शकतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य