शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
4
आरोग्य विमा की मेडीक्लेम? गंभीर आजार, ओपीडी आणि मॅटर्निटी कव्हरेज कशात मिळते, दोन्हीत किती फरक?
5
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
6
सात युद्धे थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाहीच; कुणाला मिळाला 'शांतता पुरस्कार'
7
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
8
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
9
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
10
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
11
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
12
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
13
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
14
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
15
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
16
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
17
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
18
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
19
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
20
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?

कोरोनाचा संसर्ग पुन्हा होणार? महाराष्ट्रातील 'या' शहरात Reinfection चे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 19:51 IST

CoronaVirus News & Latest Updates : लॅसेंट या वैद्यकिय नियतकालिकात कोरोनाच्या संक्रमणाबाबत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर बरा झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का असा प्रश्न अनेकांना पडतो.  गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने थैमान  घातलं आहे. कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. आता भारतात कोरोनाचं रिइंफेक्शन म्हणजेच पुन्हा संसर्ग होण्याचे  तीन संशयित रुग्ण समोर आले आहेत. त्यातही धक्कादायक म्हणजे पुन्हा होणारा कोरोनाचा संसर्ग गंभीर असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.

पुन्हा कोरोनाचं संक्रमण झालेली दोन  रुग्ण मुंबईत तर एक रुग्ण अहमदाबादमध्ये आढळून आला आहे. आयसीएमआरने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लॅसेंट या वैद्यकिय नियतकालीकात कोरोनाच्या संक्रमणाबाबत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो आणि त्याची लक्षणं अधिक गंभीर होतात असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

युएसच्या नेवाडातील २५ वर्षीय तरूणाला कोणताही आजार नव्हता. एप्रिलमध्ये कोरोनाचं संक्रमण झालं होतं. क्वारंटाईनमध्ये या तरूणाची स्थिती चांगली झाली. त्या व्यक्तीच्या दोन आरटी-पीसीआर टेस्ट नेगेटिव्ह आल्या. मात्र ४८ दिवसांनंतर ती व्यक्ती पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. दुसऱ्यांदा कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासल्याचे या रिपोर्टमध्ये दिसून आलं आहे. १ नंबर जोडपं! व्हायरल झालेल्या 'Baba Ka Dhaba' च्या रडणाऱ्या आजोबांची लव्हस्टोरी माहित्येय का?

रिइन्फेक्शन किती दिवसांनी होतं. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं कोणतीही माहिती दिलेली नाही, असं आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले. संशोधक अनंत भान यांनी दिलेल्या माहितीनुसार, '' कोरोना संसर्गातून बाहेर आल्यानंतर पुन्हा संसर्ग होत असेल तर रोगप्रतिकारकशक्ती कालावधीसाठी राहते असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून हर्ड इम्युनिटीसाठी नैसर्गिक इम्युनिटीवर अवलंबून राहण्याऐवजी लसच सुरक्षित आहे," कोरोनाने होणारे मृत्यू आणि डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेंशन या आजारांचा संबंध कसा?; जाणून घ्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य