​इंदर कुमारचे हार्ट अटॅकने झाले निधन, अटॅक आल्यानंतर कसे कराल बचाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 17:42 IST2017-07-28T12:12:39+5:302017-07-28T17:42:39+5:30

अनेकदा व्यक्ती घरात एकटा असतो अशावेळी हार्टअटॅक आल्यास काही गोष्टींकडे लक्ष दिल्या मृत्यू टाळता येऊ शकतो.

Inder Kumar died of heart attack, how to prevent the attack! | ​इंदर कुमारचे हार्ट अटॅकने झाले निधन, अटॅक आल्यानंतर कसे कराल बचाव !

​इंदर कुमारचे हार्ट अटॅकने झाले निधन, अटॅक आल्यानंतर कसे कराल बचाव !

लिवूडचा अभिनेता आणि सलमान खानचा जवळचा मित्र इंदर कुमार याचे नुकतेच हार्ट अटॅकने निधन झाले. इंदर कुमारसारखे बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींचेही याच कारणाने निधन झाले. हार्टअटॅकचा आजार सध्याच्या काळात कॉमन झाला आहे. विशेष म्हणजे हा आजार आता कोणालाही होऊ शकतो, मात्र हार्टअटॅक आल्यानंतर त्वरित काळजी घेऊन तत्परतेने काही गोष्टी केल्यास जीव वाचू शकतो. अनेकदा व्यक्ती घरात एकटा असतो अशावेळी हार्टअटॅक आल्यास काही गोष्टींकडे लक्ष दिल्या मृत्यू टाळता येऊ शकतो. 

कोणत्या गोष्टी कराल?
* छातीत दुखू लागल्यास किंवा हार्ट अटॅकची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरीत जमिनीवर सरळ झोपून आराम करावा आणि शरीराची जास्त हालचाल करु नये.

* खाली झोपल्यानंतर शरीराला पुरेसा आॅक्सिजन मिळण्यासाठी हळूहळू दिर्घ श्वास घ्यावा. 

* शरीराला अस्वस्थता वाटू नये म्हणून कपडे लगेच सैल करावेत.

* त्यानंतर आपल्याजवळील सोरब्रिटेटची एक गोळी जिभेखाली ठेवावी. सोरब्रिटेटची गोळी नसल्यास डिस्प्रिनची गोळी ठेवावी. 

* या दरम्यान पाणी किंवा इतर कोणतेही ड्रिंक घेऊ नये. यामुळे उलटी येऊ शकते आणि समस्या वाढू शकते. फक्त औषध घेऊ शकता.  

* पायांचा रक्तप्रवाह ह्रदयापर्यंत येण्यासाठी पाय थोडे उंचीवर ठेवावे. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात येऊ शकते. 

* या दरम्यान उलटी येऊ शकते. फुफ्फुसात उलटी भरु नये म्हणून एका कुशीवर पडून उलटी करावी.

* त्वरित जवळच्या व्यक्तीस किंवा डॉक्टरांना संपर्क करावा.  

Also Read : ‘या’ सेलिब्रिटींचेही ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले आहे निधन !
                    : बलात्काराच्या आरोपामुळे डिप्रेशनमध्ये होता इंदर कुमार!!


source : divyamarathi 

Web Title: Inder Kumar died of heart attack, how to prevent the attack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.