शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नवीन आजाराला निमंत्रण, 'या' जीवघेण्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; संशोधनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 14:30 IST

एका खासगी रूग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वेब आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यास केला होता. कोरोना महामारी दरम्यान देशातील लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणं जाणून घेण्यासाठी हा ऑनलाइन अभ्यास करण्यात आला होता.

गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. अशा परिस्थितीत नागरिकांना इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. कोरोना महामारी दरम्यान चिंता आणि नैराश्याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान दिल्लीतील एका खासगी रुग्णालयाच्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, खासगी रूग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वेब आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यास केला होता. कोरोना महामारी दरम्यान देशातील लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणं जाणून घेण्यासाठी हा ऑनलाइन अभ्यास करण्यात आला होता.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टीममध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, १ हजार २११ लोकांचे प्रतिसाद नोंदवले गेले. त्यापैकी १ हजार ६९ लोकांच्या प्रतिसादांचं विश्लेषण करण्यात आलं. त्यातुन निघालेल्या निष्कर्षानुसार, ४४.६ टक्के लोकांमध्ये चिंतेची सौम्य लक्षणं दिसून आली. त्याच वेळी, चिंतेची मध्यम लक्षणं ३०.१ टक्के लोकांमध्ये आढळली तर गंभीर चिंता असणारी लक्षणं २५.३ टक्के इतकी होती.

तसेच या अभ्यासानुसार, २६.१ टक्के लोकांमध्ये सौम्य डिप्रेशन असल्याचं दिसून आलं. १६.७ टक्के लोकांमध्ये मध्यमआणि ३.८ टक्के लोकांमध्ये गंभीर डिप्रेशन होतं. लॉकडाऊनच्या चार आठवड्यांत लोकांकडून सेल्फ स्टडीच्या आधारे हा डेटा तयार करण्यात आला. यात सहभागी झालेले सर्व लोक भारताचे नागरिक होते आणि त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त होते.

डॉक्टरांनी सांगितलं की, कोणत्याही मोठ्या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही. या अभ्यासात वेब आधारित सर्वेक्षण करण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य