तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की, जेव्हा खिसा रिकामा असतो, तेव्हा डोकं 'गरम' राहतं. ही बाब आता एका रिसर्चमधूनही समोर आली आहे. रिसर्चनुसार, यंग अॅडल्ट्स ज्यांच्या उत्पन्नात वर्षाला २५ टक्के घट होते, या लोकांची मध्यम वयात येईपर्यंत विचार करण्याची शक्ती आणि ब्रेन हेल्थ प्रभावित होण्याचा धोका अधिक राहतो.
या रिसर्चच्या मुख्य लेखकांनी सांगितले की, रिसर्चमध्ये अशा लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते, ज्यांना २००० साली रिसेशनचा फटका बसला होता. त्यावेळी अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. रिसर्चमधून समोर आले आहे की, उत्पन्नात जास्त चढ-उतार आणि कमाईच्या सर्वात महत्वाच्या वर्षांमध्ये उत्पन्नात घट होण्याचा थेट संबंध अनहेल्दी ब्रेनशी आहे.
हा रिसर्च जर्नल न्यूरॉलजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात ३,२८७ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. हे लोक रिसर्चच्या सुरूवातीला २३ ते २५ वयाचे होते.
अभ्यासकांनी पाहिले की, १९९०-२०१० दरम्यान कितीदा त्यांच्या पगारात घट झाली किंवा उत्पन्नाची टक्केवारी कमी झाली. रिसर्चमध्ये सहभागी लोकांना विचार आणि मेमरी टेस्टची कामे देण्यात आली होती. अभ्यासकांना आढळलं की, ज्या लोकांच्या उत्पन्नात दोनदा घट झाली होती. त्यांचा परफॉर्मन्स खराब होता.
ज्यांच्या उत्पन्नात फार जास्त घट झाली होती, त्यांनी टास्क पूर्ण करण्यासाठीही फार जास्त वेळ घेतला. त्यांची व्हर्बल मेमरी टेस्ट घेतली गेली. त्यातही त्यांचं परफॉर्मन्स खराब होतं.
तेच ७०७ लोक सहभागी असलेल्या ग्रुपमधील लोकांची एमआरआय टेस्ट करण्यात आली. नंतर २० वर्षांनंतर पुन्हा त्यांचा ब्रेन व्हॉल्यूम चेक केला गेला. ज्या लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला होता, त्यांचा ब्रेन व्हॉल्यूम कमी होता.