तोंडाच्या 'या' समस्या ठरू शकतात डायबिटीसचं कारण, दुर्लक्ष करणं पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 11:12 AM2020-04-05T11:12:02+5:302020-04-05T11:35:02+5:30

ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे डायबिटीस असताना तुम्हाला इतरही रोगांचा धोका असण्याची  शक्यता असते.

Ignoring these mouth problems can be reason diabetes myb | तोंडाच्या 'या' समस्या ठरू शकतात डायबिटीसचं कारण, दुर्लक्ष करणं पडेल महागात

तोंडाच्या 'या' समस्या ठरू शकतात डायबिटीसचं कारण, दुर्लक्ष करणं पडेल महागात

googlenewsNext

जीवनशैलीतील बदलांमुळे वयस्कर लोक नाही तर तरूण सुद्धा आजारांना बळी पडतात. साधारणपणे ३० वर्षांनंतर डायबिटीस, हृदयरोग यांसारखे आजार कधीही  होण्याची शक्यता असते. डायबिटीस सारखा आजार झाल्यानंतर तुमच्या ओरल हेल्थ कडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे.म्हणून आज आम्ही तुम्हाला अशी काही लक्षणं सांगणार आहोत. ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे डायबिटीस असताना तुम्हाला इतरही रोगांचा धोका असण्याची  शक्यता असते.

तोंडाच्या अनेक समस्यांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. या समस्या डायबिटीसचं सगळ्यात मोठं कारण ठरतात.  डायबिटीस नियंत्रणात आलं नाही तर तोंडाच्या समस्या वाढतात. त्यामुळे व्हाईट ब्लड सेल्स कमी होतात.  व्हाईट ब्लड सेल्स बॅक्टेरिअल इन्फेक्शन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. 

रिसर्चनुसार  रक्तातील साखरेची पातळी कमी केल्यानंतर डायबिटीसमुळे शरीराच्या इतर भागांना  होणारा धोका कमी केला जाऊ शकतो. डायबिटीसमुळे शरीराला तोंडाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनियंत्रित साखरेचं प्रमाण लाळेचं प्रमाण कमी करतात. त्यामुळे  तोंडात कोरडेपणा  जाणवतो. परिणामी अल्सर, दातांच्या समस्या उद्भवू शकतात. त्यातूनच हिरड्यांना सुज येण्याची, जीभेवर जळजळ होऊ शकते. तसंच डायबिटीसमुळे तोंडांची समस्या उद्भवल्यास काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपले दात आणि हिरड्यांची डेंटिस्टकडून तपासणी करून घ्या. काहीही खाल्यानंतर  दात घासा.

डायबिटीस असताना  जे लोक धुम्रपान करतात. त्यांना आजार होण्याचा जास्त धोका असतो.  धुम्रपान करत असलेल्या  व्यक्तीला धुम्रपान करत नसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत पोरिओडॉन्टल आजार होण्याची शक्यता जास्त असते. धुम्रपान करत असलेल्या व्यक्तीच्या हिरड्यांमध्ये रोग निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. 

Web Title: Ignoring these mouth problems can be reason diabetes myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.