शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'ही' औषधं घेणाऱ्यांनी लस घेतल्यानंतर मास्क न लावल्यास वाढू शकतो धोका, आत्ताच घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 17:05 IST

नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) अलीकडील सूचनांनुसार, जे लोक इम्यूनोसप्रेसेन्ट्स घेतात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणं आवश्यक आहे.

लस घेण्याबरोबरच कोरोना नियमांचं पालन करण्याने संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही, बरेच लोक व्हायरसच्या संपर्कात येत आहेत. लसीकरण केवळ कोरानाच्या तीव्रतेचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तज्ज्ञ सांगतात की, लसीकरण पूर्ण संरक्षण देत नाही आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं तसेच इतर सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) अलीकडील सूचनांनुसार, जे लोक इम्यूनोसप्रेसेन्ट्स घेतात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणं आवश्यक आहे.

लोकांनी सावधानता बाळगणं का गरजेचं?अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम खूप वेगाने सुरू आहे. परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की, कोणतीही लस कोरोना विषाणूपासून पूर्ण संरक्षण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाला संसर्ग होण्याचा धोका असतो. परंतु नियमितपणे काही औषधांच्या सेवनाने किंवा काही आजारांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास संसर्गाचा धोका जास्त असतो. 

का गरजेचं आहे लसीकरण?लसीकरण आपल्याला रोग प्रतिकारशक्ती देतं. परंतु त्याची लक्षणं व्यक्तीनुसार बदलतात. लसीकरण केवळ काही प्रमाणात व्हायरसपासून आपलं संरक्षण करतं. जामामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लसीच्या पहिल्या डोसनंतर अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींमध्ये १७ टक्के कोविड अँटीबॉडीज तयार होतात.

इम्यूनोसप्रेसंट औषधं घेणाऱ्या लोकांसाठी मास्क आवश्यकइम्युनोसप्रेसंट औषधं ही औषधांचा एक वेगळा वर्ग आहे. यकृत, हृदय किंवा किडनी यांसारखे अवयव प्रत्यारोपणानंतर यापैकी काही औषधं दिली जातात. जेणेकरून शरीराने प्रत्यारोपित केलेला अवयव शरीर नाकारण्याची शक्यता कमी होते. ल्यूपस, सोरायसिस आणि संधिवात यासारख्या विकारांवर उपचार करण्यासाठी इतर प्रकारची इम्यून संदर्भातील औषधं वापरली जातात. त्यामुळे या आजारांनी ग्रस्त लोकांनी घराबाहेर पडताना मास्क घालाणं अत्यंत गरजेचं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या