शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला ‘शुगर’ गिफ्ट करायची नसेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 12:20 IST

‘गर्भावस्थेतील मधुमेह’ (जीडीएम) हा मधुमेहाचा एक प्रकार आहे. तो गर्भावस्थेत साधारणपणे २० ते २४ आठवड्यांनंतर उद्भवतो. अर्थात बहुतांश महिलांची प्रसूती झाल्यानंतर जसा आला तसा तो नाहीसा देखील होतो. काही महिलांमध्ये हा प्रकार पहिल्या काही आठवड्यांमध्ये उद्भवू शकतो.

डॉ. सुनील गुप्ता, मधुमेहतज्ज्ञ

गर्भावस्थेत शरीराला अधिक इन्सुलिनची गरज असते; परंतु शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नसल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि गर्भावस्थेतील मधुमेह होतो. योग्य वेळी निदान व उपचार न झाल्यास गर्भाच्या वाढीवर आणि अवयवांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. आईच्या रक्तातील जास्त साखरेमुळे पुढील आयुष्यात मुलांमध्ये स्थूलता आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लवकर निदान आणि योग्य उपचार अत्यंत आवश्यक आहेत.

निदान कसे केले जाते?

निदान साधारणपणे गर्भावस्थेदरम्यान रक्तातील साखरेची तपासणी करून केले जाते. भारतात प्रत्येक गर्भवती महिलेसाठी सार्वत्रिक तपासणी करण्याची शिफारस केली जाते आणि ती पहिल्या प्रसूतीपूर्व भेटीत करावी. यासाठी ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट (जीसीटी) ही चाचणी केली जाते.

या चाचणीत गर्भवतीला ७५ ग्रॅम ग्लुकोज द्रावण पिण्यास दिले जाते आणि दोन तासांनंतर साखरेची पातळी मोजली जाते. जर साखरेची पातळी १४० एमजी टक्क्यांपेक्षा जास्त आढळली, तर गर्भावस्थेतील मधुमेह आहे, असे निदान केले जाते.

सरकारने स्क्रीनिंग आणि निदानासाठी एक-चरणीय ७५ ग्रॅम ग्लुकोज चॅलेंज टेस्ट चाचणी करण्याची शिफारस केली आहे. लवकर निदान झाल्यास वेळेवर उपचार सुरू करता येतात आणि आई व बाळ यांच्यात होणाऱ्या गुंतागुंती टाळता येतात.

का होतो हा आजार?

गर्भावस्थेमुळे महिलेच्या शरीरावर अतिरिक्त शारीरिक ताण येतो. या काळात ह्युमन प्लॅसेंटल लॅक्टोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि कॉर्टिसोल यांसारखे हार्मोन्स स्रवतात. हे हार्मोन्स शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी करतात. या स्थितीला ‘इन्सुलिन प्रतिकार’ असे म्हणतात. 

गर्भावस्थेबरोबर तोही अधिक वाढतो. सामान्यतः स्वादुपिंडातील बीटा पेशी अधिक इन्सुलिन तयार करून हा बदल भरून काढतात. पण त्या जर वाढलेल्या गरजेनुसार इन्सुलिन तयार करू शकल्या नाहीत तर रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि गर्भावस्थेतील मधुमेह होतो. स्थूलता, कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आणि पूर्वी गर्भावस्थेतील मधुमेह झालेला असल्यास तो होण्याचा धोका जास्त असतो.

उपचार कसे केले जातात?

उपचाराचा उद्देश गर्भवतीच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे असतो. उपाशीपोटी रक्तातील साखर ९५ एमजी टक्क्यांपेक्षा कमी व जेवणानंतर दोन तासांनी १२० एमजी टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. सुरुवातीला मेडिकल न्यूट्रिशन थेरपी, संतुलित आहार व नियमित व्यायामाचा (उदा. चालणे) सल्ला दिला जातो. रक्तातील साखरेचे नियमित परीक्षण करणेही महत्त्वाचे असते. जर आहार आणि व्यायामाने साखर नियंत्रण झाले नाही तर इन्सुलिन उपचार दिले जातात. कारण ते गर्भावस्थेत सुरक्षित मानले जाते. काहीवेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने मेटफॉर्मिनसारखी औषधेही देतात. नियमित तपासणी आणि गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवणेही आवश्यक असते.

कोणते धोके संभवतात?

गर्भावस्थेतील अनियंत्रित मधुमेहामुळे आई आणि बाळ दोघांमध्येही काही शारीरिक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. बाळाचा आकार खूप मोठा होऊ शकतो (मॅक्रोसोमिया). असे झाल्यास प्रसूती कठीण होऊ शकते किंवा सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागते. जन्मानंतर बाळामध्ये रक्तातील साखर कमी होणे, श्वसनाचे त्रास किंवा ‘पिवळा कावीळ’ होऊ शकतो. अशा मुलांना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका संभवतो. आईमध्ये उच्च रक्तदाब, प्रीक्लॅम्प्सिया यांसारख्या समस्या उद्भवू शकतात आणि भविष्यात टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. योग्य उपचार आणि नियंत्रणामुळे हे धोके मोठ्या प्रमाणात कमी करता येतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prevent gestational diabetes: Protect your baby from lifelong sugar risk.

Web Summary : Gestational diabetes impacts fetal development, potentially leading to childhood obesity and diabetes. Early screening via glucose challenge test is crucial. Management involves diet, exercise, and sometimes insulin to mitigate risks for both mother and child.
टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाdiabetesमधुमेह