जर तुम्ही वजन कमी केलं नाहीत, तर बाळाला होऊ शकतो मधुमेह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 16:43 IST2019-03-05T16:42:12+5:302019-03-05T16:43:04+5:30
आतापर्यत असंच समजलं जात होतं की, फक्त आईच्या आरोग्याचाच गर्भामधील बाळावर सर्वाधिक परिणाम होत असतो. परंतु द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या संशोधनातून सर्वांना आश्चर्यचकित करणारे परिणाम समोर आले आहेत.

जर तुम्ही वजन कमी केलं नाहीत, तर बाळाला होऊ शकतो मधुमेह!
(Image Credit : Baby Chick)
आतापर्यत असंच समजलं जात होतं की, फक्त आईच्या आरोग्याचाच गर्भामधील बाळावर सर्वाधिक परिणाम होत असतो. परंतु द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या संशोधनातून सर्वांना आश्चर्यचकित करणारे परिणाम समोर आले आहेत. संशोधनातून असे निष्कर्ष समोर आले आहेत की, लठ्ठ माणसांच्या शुक्राणूंमध्येही बदल घडून येत असतात. ज्यामुळे होणारं बाळ ते आजार आनुवांशिकरित्या सोबत घेऊन येतं. त्यामुळे जर तुम्हाला वडील बनायचं असेल तर तुमच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी सर्वात आधी वजन कमी करा.
लठ्ठपणा सर्वात मोठी समस्या
सध्याच्या काळात सर्वांच्या लाइफ स्टाइलमध्ये अनेक बदल घडून आले आहेत. ज्यामुळे जास्तीतजास्त लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. उत्तम डाएट आमि व्यायाम केल्यानंतरही अनेक लोकांना लठ्ठपणाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यासंदर्भात करण्यात आलेल्या अनेक संशोधनांमधून लठ्ठपणा वाढविण्यासाठी सर्वात मोठं कारण तणाव असल्याचं सिद्ध झालं. फक्त एवढचं नाही तर अशा लोकांना आई-वडील बनण्यासाठीही अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळेच अनेक तज्ज्ञ बाळाला जन्म देण्याचा विचार करण्याआधी जोडप्यांना आरोग्याच्या समस्या दूर करण्याचा सल्ला देतात.
असं सांगतं संशोधन
आई-वडीलांच्या आरोग्याचा मुलांच्या हेल्थवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या या संशोधनातून याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. संशोधनानुसार, लठ्ठ व्यक्तींच्या शुक्राणूंमध्येही बदल घडून येतात. ज्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये डायबिटीजचा धोका वाढतो. यूनिवर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्सच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, गर्भधारणेच्या वेळी वडिलांचं वजन, आहार आणि त्यांच्या होणाऱ्या मुलाला डायबिटीज होण्याची गोष्ट पहिल्यांदाच समोर आली आहे. या संशोधनाचे परिणाम नेचर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
अशाप्रकारे घ्या आपली काळजी
जर तुम्हाला आपल्या होणाऱ्या बाळाला डायबिटीज आणि लठ्ठपणासारख्या आजारांपासून दूर ठेवायचे असेल तर बेबी प्लॅन करण्याआधी स्वतःच्या आरोग्यावर लक्ष द्या. आपल्या रूटीनमध्ये हेल्दी डाएट, व्यायाम आणि काही पॉझिटिव्ह अॅक्टिविटीजचा समावेश करा. ज्यामुळे शरीरासोबतच मनानेही निरोगी राहण्यास मदत होते.