शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

हाता पायांना घाम येत असेल तर 'या' गंभीर आजाराची शक्यता, वेळीच करा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 4:24 PM

उन्हाळ्यात,जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे. पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो. कोणताही ऋतू असुदेत, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला हा गंभीर विकार असू शकतो.

उन्हाळ्यात,जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे. पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो. कोणताही ऋतू असुदेत, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला हाइपरहाइड्रोसिस हा विकार असु शकतो. बऱ्याचदा जर हाता-पायाला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर त्यामागे अनुवांशिक कारणे असू शकतात. काही लोकांमध्ये मुळातच घाम यायचे प्रमाण खूप जास्त असते. कधीतरी हवेतील उष्णतेमुळे, ताप, काही इन्फेक्शन, गरम व उबदार कपडे यामुळे सुद्धा हाताला आणि पायाला जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो. तुम्ही नर्व्हस असाल, कसली भीती किंवा दडपण असेल तरीही तळ हाताला जास्त प्रमाणात घाम येतो. हाता-पायाला घाम येऊ नये यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?

१. बेकिंग सोडा बेकिंग सोडा घाम कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. यासाठी, बेकिंग सोडयाची थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा आणि आपल्या हाताला लावा. पाच मिनिटे आपल्या हातावर पेस्ट घासून घ्या आणि नंतर आपले हात धुवा. याचा नियमित वापर केल्यास हातांना घाम येणे कमी होईल.

२. विनेगरविनेगर मुळे हातापायांना घाम येण्याची समस्या दूर होते. २ चमचे विनेगर, २ चमचे मधाबरोबर एकत्रित करा. हे ग्लासभर पाण्यात मिसळा आणि अनाशापोटी प्या.

३. लिंबाचा रसलिंबामध्ये असलेले सायट्रिक ऍसीड जीवाणूंची वाढ थांबवते. लिंबामुळे हाताच्या व पायाच्या त्वचेला सुद्धा फायदा होतो, घाम येण्याचे प्रमाण हमखास कमी होते. ४.यासाठी लिंबाच्या रसात मीठ घालून ते हाताला व पायाला व्यवस्थित चोळून घ्यावे. हे मिश्रण हाताच्या व पायाच्या त्वचेमध्ये शोषले जाईल. यामुळे घाम येण्याचे प्रमाण लगेचच कमी होईल. 

४. चहा चहामध्ये असलेल्या टॅनिक ऍसीडमुळे जीवाणूंची वाढ कमी व्हायला मदत होते. यासाठी चार चमचे चहा, दोन कप पाणी घेऊन उकळून घ्यायचे. बादलीत थंड पाणी घेऊन त्यात हा काळा चहा घालायचा. या चहाच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसल्याने फायदा होतो. हा उपाय आठवड्याभरासाठी रोज केल्याने लगेच फरक दिसून येतो.

५. नारळ तेलनारळ तेल हे अत्यंत गुणकारी आहे. तुम्ही नारळ तेल हाता पायांना चोळू शकता त्यामुळे घाम येण्याची समस्या दूर होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स