हाता पायांना घाम येत असेल तर 'या' गंभीर आजाराची शक्यता, वेळीच करा उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:24 IST
उन्हाळ्यात,जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे. पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो. कोणताही ऋतू असुदेत, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला हा गंभीर विकार असू शकतो.
हाता पायांना घाम येत असेल तर 'या' गंभीर आजाराची शक्यता, वेळीच करा उपाय
उन्हाळ्यात,जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे. पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो. कोणताही ऋतू असुदेत, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला हाइपरहाइड्रोसिस हा विकार असु शकतो. बऱ्याचदा जर हाता-पायाला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर त्यामागे अनुवांशिक कारणे असू शकतात. काही लोकांमध्ये मुळातच घाम यायचे प्रमाण खूप जास्त असते. कधीतरी हवेतील उष्णतेमुळे, ताप, काही इन्फेक्शन, गरम व उबदार कपडे यामुळे सुद्धा हाताला आणि पायाला जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो. तुम्ही नर्व्हस असाल, कसली भीती किंवा दडपण असेल तरीही तळ हाताला जास्त प्रमाणात घाम येतो. हाता-पायाला घाम येऊ नये यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?
१. बेकिंग सोडा बेकिंग सोडा घाम कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. यासाठी, बेकिंग सोडयाची थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा आणि आपल्या हाताला लावा. पाच मिनिटे आपल्या हातावर पेस्ट घासून घ्या आणि नंतर आपले हात धुवा. याचा नियमित वापर केल्यास हातांना घाम येणे कमी होईल.
२. विनेगरविनेगर मुळे हातापायांना घाम येण्याची समस्या दूर होते. २ चमचे विनेगर, २ चमचे मधाबरोबर एकत्रित करा. हे ग्लासभर पाण्यात मिसळा आणि अनाशापोटी प्या.
३. लिंबाचा रसलिंबामध्ये असलेले सायट्रिक ऍसीड जीवाणूंची वाढ थांबवते. लिंबामुळे हाताच्या व पायाच्या त्वचेला सुद्धा फायदा होतो, घाम येण्याचे प्रमाण हमखास कमी होते. ४.यासाठी लिंबाच्या रसात मीठ घालून ते हाताला व पायाला व्यवस्थित चोळून घ्यावे. हे मिश्रण हाताच्या व पायाच्या त्वचेमध्ये शोषले जाईल. यामुळे घाम येण्याचे प्रमाण लगेचच कमी होईल.
४. चहा चहामध्ये असलेल्या टॅनिक ऍसीडमुळे जीवाणूंची वाढ कमी व्हायला मदत होते. यासाठी चार चमचे चहा, दोन कप पाणी घेऊन उकळून घ्यायचे. बादलीत थंड पाणी घेऊन त्यात हा काळा चहा घालायचा. या चहाच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसल्याने फायदा होतो. हा उपाय आठवड्याभरासाठी रोज केल्याने लगेच फरक दिसून येतो.
५. नारळ तेलनारळ तेल हे अत्यंत गुणकारी आहे. तुम्ही नारळ तेल हाता पायांना चोळू शकता त्यामुळे घाम येण्याची समस्या दूर होते.