पावसाळ्यात पोट दुखत असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 04:57 PM2019-07-26T16:57:27+5:302019-07-26T17:07:49+5:30

पावसाळा सुरु झाल्यावर दूषित पाणी, तेलकट पदार्थ आणि थंडगार हवा यामुळे अनेकदा पोट दुखते. अशावेळी थेट पेनकिलर घेण्याऐवजी किंवा थेट डॉक्टरकडे जाण्याऐवजी काही घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा

If the suffer from stomach pain in the rainy season, try this home remedy | पावसाळ्यात पोट दुखत असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा

पावसाळ्यात पोट दुखत असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा

googlenewsNext

पावसाळा सुरु झाल्यावर दूषित पाणी, तेलकट पदार्थ आणि थंडगार हवा यामुळे अनेकदा पोट दुखते. अशावेळी थेट पेनकिलर घेण्याऐवजी किंवा थेट डॉक्टरकडे जाण्याऐवजी काही घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा. तेव्हा कमीत कमी पैशात आणि घरच्या घरी होणारे हे उपाय नक्की करून बघा. 

  • पावसाळ्यात पाणी दूषित असते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून, थंड करून प्यावे. बाहेरही स्वच्छ पाणी असेल तरच प्यावे. शिवाय गरम पाण्यामुळे शरीरातील वात कमी होऊन पोट दुखण्याचे प्रसंग कमी होतात. 

 

  • कोमट अर्धे लिंबू आणि पाव चमचा हिंग टाकून घेतल्यानेही पोटदुखी थांबते. 

 

  • खूप पोट दुखत असेल तर चमचाभर ओवा चावून खावा. ओव्याचे पाणी पिण्यापेक्षा हा अधिक चांगला उपाय आहे. 

  • बडीशेपही पोटदुखीवरचे औषध असून भाजलेली खाल्ल्यावरही बरे वाटते. 

 

  • लसणाच्या चार पाकळ्या चमचाभर तुपात भाजून घ्या. त्यात लहान चमचा भर हिंग घालून चिमूटभर मीठ घालून खा आणि २० मिनिट पाणीही पिऊ नका. 

Web Title: If the suffer from stomach pain in the rainy season, try this home remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.