PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज नॉक आऊट सामना धर्मशाला येथे होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:34 PM2024-05-09T20:34:31+5:302024-05-09T20:34:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : RCB 119/3 IN 10 OVERS AND RAIN STOPPED PLAY, If the match is abandoned, both RCB and PBKS will be eliminated from IPL 2024 | PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता

PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi :  पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज नॉक आऊट सामना धर्मशाला येथे होत आहे. बंगळुरू ११ सामन्यांत ४ विजयांसह ८ गुण मिळवून सातव्या क्रमांकावर आहेत आणि प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. पंजाब किंग्सचीही हिच अवस्था आहे. हे लक्षात घेऊन बंगळुरूने आक्रमक सुरुवात करताना १० षटकांत ३ बाद ११९ धावा चोपल्या. पण, पाऊस व गारा यामुळे सामना थांबवावा लागला आहे आणि जर हा सामना झाला नाही तर काय होईल... 

१७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला; पुजारा, सर्फराज, सूर्याला बाद करून चर्चेत आला


पंजाबचा कर्णधार सॅम करन याने टॉस जिंकून RCB ला प्रथम फलंदाजीला बोलावले. RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ९) आणि विल जॅक्स ( १२) यांना आज मोठी खेळी करण्यापासून विद्वथ कावेरप्पाने ( Vidwath Kaverappa) रोखले. PBKS च्या खेळाडूंनी पॉवर प्लेमध्ये विराट कोहलीला दोन जीवदान दिले. रजत पाटीदार याचाही एक झेल टाकला. गचाळ क्षेत्ररक्षणाची खूप मोठी भरपाई पंजाबला द्यावी लागली. कागिसो रबाडाशिवाय मैदानावर उतरलेल्या पंजाबला विराट व रजत यांनी बेक्कार चोपले. रजतने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि १० षटकांत बंगळुरूला ३ बाद ११९ धावांपर्यंत पोहोचवले. १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सॅम करनने ७६ धावांची भागीदारी तोडली. रजत २३ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५५ धावांवर झेलबाद झाला.  


१०व्या षटकानंतर धर्मशालामध्ये पाऊस सुरू झाला आणि सामना थाबंवण्यात आला. विराट २३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर खेळतोय. हा सामना झाला नाही, तर दोन्ही संघाचे आव्हान संपुष्टात येईल आणि मुंबई इंडियन्सच्या पंकतीत जाऊन ते बसतील.

Web Title: IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : RCB 119/3 IN 10 OVERS AND RAIN STOPPED PLAY, If the match is abandoned, both RCB and PBKS will be eliminated from IPL 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.