लहान मुलांसाठी आइसक्रीम ठरू शकते घातक, या टिप्सने सोडवा त्यांची सवय...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 02:03 PM2024-03-30T14:03:11+5:302024-03-30T14:03:52+5:30

लहान मुलांसाठी आइसक्रीम या दिवसात घातक ठरू शकते. अनेकांना तर आइसक्रीम खाण्याची सवयच लागलेली असते.

Ice cream can be dangerous for kids, break their habit with these tips... | लहान मुलांसाठी आइसक्रीम ठरू शकते घातक, या टिप्सने सोडवा त्यांची सवय...

लहान मुलांसाठी आइसक्रीम ठरू शकते घातक, या टिप्सने सोडवा त्यांची सवय...

उन्हाळा सुरू होताच लोक थंड पदार्थ खाणं सुरू करतात. यात सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे आइसक्रीम. लहान मुले असो वा मोठे सगळेच आवडीने आइसक्रीम खातात. काही वेळ याने चांगलं वाटत असलं तरी जेव्हा लहान मुले रोज आइसक्रीम खातात तेव्हा मोठी समस्या होऊ शकते. यामुळे त्यांच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.

लहान मुलांसाठी आइसक्रीम या दिवसात घातक ठरू शकते. अनेकांना तर आइसक्रीम खाण्याची सवयच लागलेली असते. अशात ही सवय मोडणं पालकांसाठी अवघड होऊन जातं. त्यामुळे आज आम्ही हे टाळण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांद्वारे सहजपणे तुम्ही लहान मुलांची ही सवय सोडू शकता.

लहान मुलांची आइसक्रीमची सव मोडण्यासाठी जेव्हाही लहान मुलांना आइसक्रीम खाण्याची ईच्छा झाली तर त्यांच्यासमोर दही, स्मूदी, फळं या गोष्टी ठेवा. घरात आइसक्रीम स्टोर करून ठेवू नका. त्याशिवाय मुलांनी पैसे मागितले तर त्यांना पैसे न देता फळं किंवा ड्राय फ्रूट्स देऊ शकता. त्यांचं लक्ष वेगळ्या गोष्टी करून भरकटवा. याने त्यांची आइसक्रीमची सवय मोडेल.

मुलांसाठी आइसक्रीम घातक

लहान मुलांनी खूप जास्त आइसक्रीम खाणं फार घातक मानलं जातं. कारण यात असलेल्या शुगरमुळे मुलांचे दात खराब होतात. तसेच यात कॅलरीही जास्त असतात. ज्यामुळे कमी वयात ते लठ्ठपणाचे शिकार होतात. त्याशिवाय रोज आइसक्रीम खाल्ल्याने सर्दी-खोकलाही होऊ शकतो. आइसक्रीम थंड लागत असली तरी ती गरम असते. त्यामुळे आरोग्याला अनेक समस्या होतात.

Web Title: Ice cream can be dangerous for kids, break their habit with these tips...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.