शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 14:28 IST

The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे. 

Weight Loss : लठ्ठपणाचे शिकार झालेल्या लोकांमध्ये जास्त त्रास होतो तो पोटावरील चरबीचा. एक्सपर्ट्सही हे मानतात की, वजन कमी करण्यासाठी बेली फॅट म्हणजेट पोटावरील चरबी कमी करणं सर्वात कठीण असतं. एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय आणि The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे. 

डाएट एक्सपर्ट्स असं मानतात की, २४ तासातून तुम्ही जर ३ वेळा दह्याचं सेवन केलं तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होण्यापासून वाचू शकता. पोटावर चरबी आल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. जर तुम्हालाही पोटावर चरबी वाढल्याची समस्या झाली असेल तर दही खाण्याचे फायदे जाणून घेतले पाहिजे.  

बेली फॅट का आहे घातक?

कंबरेच्या आजूबाजूला चरबी होण्याला बेली फॅट म्हटलं जातं. डॉक्टर्सही सांगतात की, पोटावर चरबी वाढल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. स्ट्रोक आणि हृदय रोगाचा धोकाही अधिक असतो. त्यासोबतच पोटावर चरबी वाढल्याने शरीरात अनेक बदलही होतात. जसे की, मेटाबॉलिक रेट कमी होतो. कोर्टिसोल हार्मोनची निर्मिती वाढते. आणि हे कोर्टिसोल हार्मोन स्ट्रेस वाढवण्याचं काम करतात.

तसेच पोटावर चरबी अधिक असल्याने सायटोकिनचं प्रमाणही वाढतं, ज्याने शरीरातील इन्फ्लेमेटरीचं प्रमाण वाढतं. यामुळेच शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि डायबिटीसचा धोका अनेक पटीने वाढतो. म्हणजे सर्व गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत.

कोणत्या आजारांचा धोका?

पोट आणि कंबरेवर चरबी वाढल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. त्यात प्रामुख्याने हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलची समस्या, हार्ट स्ट्रोक, डिमेंशिया, किडनीची समस्या आणि कॅन्सरचाही धोका वाढतो.

दही खाण्याचे फायदे

दही हे एक प्रोबायोटिक आहे. आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरिया वाढवण्यासाठी दह्याचं सेवन फायदेशीर ठरतं. त्यामुळेच दह्याचं सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि पचनक्रियाही सुधारते. असं असलं तरी दह्यात फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे, याची काळजी घ्यावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्य