छातीत गॅसमुळे वेदना आणि हार्ट अटॅक यातील फरक कसा ओळखाल? अनेकजण होतात कन्फ्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:32 PM2022-06-30T12:32:04+5:302022-06-30T12:33:41+5:30

Gas Symptoms And Heart Attack: पोट किंवा कोलनच्या लेफ्ट साइडला होणारा गॅस, हार्ट पेनसारखाच जाणवतो. अशात हार्ट पेनच्या संकेताना समजून घेणं महत्वाचं आहे.

How to differentiate between gas pain in chest and heart attack many people are confused | छातीत गॅसमुळे वेदना आणि हार्ट अटॅक यातील फरक कसा ओळखाल? अनेकजण होतात कन्फ्यूज

छातीत गॅसमुळे वेदना आणि हार्ट अटॅक यातील फरक कसा ओळखाल? अनेकजण होतात कन्फ्यूज

googlenewsNext

Gas Symptoms And Heart Attack: हार्ट अटॅक आला तर छातीत वेदना आणि दबाव जाणवतो. अनेक गॅस किंवा अपचन झालं असेल तर छातीत दुखू लागतं. अशात हे समजून घेणं महत्वाचं ठरतं की, छातीत दुखणं हा नेहमी हार्ट अटॅकचा संकेत नसतो. गॅस किंवा अॅसिडीटीमुळेही छातीत दुखतं आणि अस्वस्थ वाटू शकतं. गॅसमुळे छातीत दुखत असेल तर जास्त चिंता करण्याची गरज नाही. पण यातील फरक समजून घ्यायला हवा की, अॅसिडीटी झाल्यावर कशाप्रकारच्या वेदना होतात आणि हार्ट अटॅकची स्थिती कशी असते. जेणेकरून वेळीच तुम्ही हार्ट अटॅकचं लक्षण समजू शकाल.

पोट किंवा कोलनच्या लेफ्ट साइडला होणारा गॅस, हार्ट पेनसारखाच जाणवतो. अशात हार्ट पेनच्या संकेताना समजून घेणं महत्वाचं आहे.

- छातीत वेदनेसह दबाव

- हलकं हलकं वाटणं किंवा जांभया येणं

- घाबरल्यासारखं वाटणं

- श्वास घेण्यास त्रास होणे

गॅस झाल्यास कशा होतात छातीत वेदना?

लोक नेहमीच छातीत होणाऱ्या गॅसच्या वेदनेला अस्वस्थता किंवा आकडलेपणाच्या रूपात सांगतात. गॅसमध्ये वेदना छातीसोबतच पोटातही होते. यासोबतच पोटावर सूज, आंबट ढेकर, भूक लागणे आणि मळमळसारखं होऊ शकतं.

छातीत गॅस कसा होतो?

शिळं किंवा दूषित पदार्थ खाल्ल्याने फूड पॉयजनिंग होऊ शकते. ज्याने छातीत गॅस तयार होतो आणि वेदनाही होते. सोबतच उलटी आणि जुलाबही लागतात.

फूड इंटॉलरन्स -

फूड इन्टॉलरन्सच्या स्थितीत पचन तंत्र प्रभावित होतं. ज्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त गॅस होतो. लॅक्टोज इन्टॉलरन्स किंवा ग्लूटेन इन्टॉलरन्स गॅसचं मुख्य कारण आहे. या स्थितीत पोटात दुखणं, सूज आणि गॅस तयार होतो. असं झाल्यास गॅसमुळे छातीत वेदना होऊ शकते. 

Web Title: How to differentiate between gas pain in chest and heart attack many people are confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.