कॅन्सर किती गंभीर? एआय सांगणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 06:05 IST2024-04-01T06:05:21+5:302024-04-01T06:05:53+5:30
Health: कोणत्याही क्लिष्ट बाबी, विपुल माहिती आदींचे क्षणात बिनचूक विश्लेषण करण्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षमतेचा वापर आता कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील उपचारातही होणार आहे.

कॅन्सर किती गंभीर? एआय सांगणार
बंगळुरु - कोणत्याही क्लिष्ट बाबी, विपुल माहिती आदींचे क्षणात बिनचूक विश्लेषण करण्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षमतेचा वापर आता कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील उपचारातही होणार आहे. येथील अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये देशातील पहिल्या प्रीसिजन ऑन्कोलॉजी सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. कॅन्सर नेमक्या कोणत्या स्टेजला आहे, कोणत्या उपचारांची गरज आहे हे ठरवण्यासाठी एआयकडून रुग्णाचे काढलेले एक्सरे, सीटी स्कॅन, मॅमोग्रॅम आदी फोटो तसेच रिपोर्टचा आधार घेत अचूक विश्लेषण केले जाईल.