पर्यायी उपायांमध्ये अनेकदा त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात येतं, ज्या निसर्गापासून मिळण्यास मदत होते आणि ज्यांचे अजिबात साइड इफेक्ट्स नसतात. यांपैकीच एक म्हणजे, कॅफेन थेरपी (Caffeine therapy). तुम्हाला ऐकून थोडं नवल वाटलं असेल ना?, पण अनेक लोक दररोज कॅफेन थेरपीचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे. आता तुम्ही म्हणाल की, अनेकदा कॅफेनचं सेवन कमी करण्याचा सल्ला देण्यात येतो. एवढंच नाहीतर कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे कॉफी न पिण्याचा किंवा कमी पिण्याचा सल्ला दिला जातो. दे हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, कॅफेन थेरपी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असून  जाणून घेऊया काय आहे कॅफेन थेरपी आणि शरीरासाठी कशी ठरते फायदेशीर याबाबत... 

कॅफेन थेरपी (Caffeine Therapy)

कॅफेन जगभरामध्ये सर्वात जास्त वापरण्यात येणारं फूड प्रोडक्ट आहे. अनेक पदार्थांमध्ये कॅफेनचा वापर करण्यात येतो. निसर्गातील साठपेक्षा एधिक वनस्पतींपासून कॅफेन प्राप्त केलं जाऊ शकतं. शरीराच्या वेदना दूर करण्यासाठीही कॅफेन मदत करतं. त्याचबरोबर मानसिक शांततेसाठी आणि तणावावर उपचार म्हणून कॅफेन काही प्रमाणात मदत करतं. कॅफेनचे हेच गुणधर्म लक्षात घेऊन कॅफेन थेरपीचा वापर करण्यात येतो. 

अशाप्रकारे मदत करते कॅफेन थेरपी 

कॅफेन थेरपी एक नैसर्गिक पद्धतीने वेदना दूर करणारा उपचार आहे. हे शरीराच्या पचनक्रियेलाही प्रभावित करू शकतो. कॅफेन थेरपीमध्ये एका निश्चित प्रमाणात कॅफेन रूग्णाला देण्यात येतं. ज्यामुळे हे त्याच्या मेंदूशी निगडीत असणाऱ्या तंत्रिकांना उत्तेजित करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ज्यामुळे रूग्णामध्ये पहिल्यापेक्षा जास्त ऊर्जा दिसून येते. 

एका ठराविक प्रमाणात करा उपयोग 

कॅफेन थेरपीचे अनेक फायदे असूनही अनेक तज्ज्ञ कॅफेनचं एका ठराविक प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात. कॅफेनच्या अतिसेवनाने शरीराला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. कॅफेनच्या अतिसेवनाने अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. यामुळे हृदयाचे ठोके वाढणं, हायपरटेन्शनचाही धोका वाढतो. जेवल्यानंतर लगेचंच कॅफेनचं सेवन पोषक तत्व कमी करण्याचं कारण ठरू शकतं. यामुळे शरीरातील कॅल्शिअमवरही परिणाम दिसून येतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 


Web Title: How much do you know about caffeine therapy see how it affects the body
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.