शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

पोटातील जळजळ आणि गॅस पळवा केवळ १० मिनिटात, वापरा हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:18 AM

अनेकदा काही खाल्लं की, काही लोकांच्या पोटात जळजळ सुरु होते. खासकरुन जास्त तिखट किंवा मसालेदार काही खाल्ल्यावर ही समस्या होते.

(Image Credit : FirstCry Parenting)

अनेकदा काही खाल्लं की, काही लोकांच्या पोटात जळजळ सुरु होते. खासकरुन जास्त तिखट किंवा मसालेदार काही खाल्ल्यावर ही समस्या होते. तसेच ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा गॅसची समस्या असते, त्यांच्या पोटही नेहमी गरम राहतं. पोटात गरम वाटण्याची किंवा जळजळ होण्याची ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, याने रुटीन लाइफ डिस्टर्ब होते. 

छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण अन्न पचण्यासाठी आवश्यक असलेला रस तयार होण्याची अनियमीतता. पण ही समस्या आपल्या किचनमध्ये असलेल्या कितीतरी पदार्थांच्या माध्यमातून सहज दूर केली जाऊ शकते. यांनी पोटाचीची नाही तर इतरही समस्या दूर होतात. पोटात होणारी जळजळ केवळ १० मिनिटात दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.  

जेवण झाल्यावर गूळ खावा

जर तुम्हाला पोटात जळजळ होण्याची समस्या होत असेल तर रोज जेवण झाल्यावर थोडा गूळ चघळायला हवा. गूळ चाऊन खाऊ नका. जितका जास्त तुम्ही गूळ चघळाल तितका जास्त फायदा होईल. याने पचनक्रियेची क्षमता वाढते आणि पोटाची जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

टोमॅटो आणि संत्री

(Image Credit : Saveur Chic)

पोटात होणारी जळजळ दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतं. कच्चा टोमॅटोचा आहारात समावेश करा. याने अ‍ॅसिडिटी आणि पोटाची जळजळ लगेच दूर होईल. टोमॅटोमुळे शरीरातील क्षारचं प्रमाण वाढतं. ठिक असंच काम संत्री करतात. 

आल्याचा रस

आल्याचा रस सुद्धा पोटातील जळजळ आणि गरम वाटणं दूर करतो. लिंबाचा रस, मध आणि आल्याचा रस पाण्यात एकत्र करुन सेवन करा. याने पोट शांत होईल. आल्यामध्ये अ‍ॅंटी बॅक्टेरिअल गुणही असतात त्यामुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया सुद्धा नष्ट होतात. 

बडीशेपेचं पाणी

१ कप उकळलेल्या पाण्यात एक चमचा बडीशेप मिश्रित करुन रात्रभर तसंच ठेवा. सकाळी हे मिश्रण गाळून त्यात एक चमचा मध टाकून सेवन करा. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्या. याने पोटाची जळजळ, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होईल. तसेच पोट फुगणे आणि गॅसची समस्याही दूर होईल. 

ओवा

एका पॅनमध्ये ओवा भाजून त्याची पावडर तयार करा. यात थोडं काळं मीठ मिश्रित करा. हे जेवण केल्यावर कोमट पाण्यासोबत सेवन करा. याने पोटाची जळजळ आणि अ‍ॅसिडिटी दूर होईल. ओव्यात थायमॉल आणि काळ्या मिठात अल्केलाइड्स असतात. याने अ‍ॅसिडिटी दूर होते. 

(टिप - वरील सल्ले केवळ माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. यातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला याचा फायदा होईलच असे नाही.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य